Luxury Life On River: 3200 Km ची नदीयात्रा पार करणार मेड इन इंडिया गंगा विलास क्रूज, पाहा खासियत

Luxury Life On River: हे जहाज देशातील सर्वात लांब प्रवासावर निघाले आहे.

Luxury Life On River: 3200 Km ची नदीयात्रा पार करणार मेड इन इंडिया गंगा विलास क्रूज, पाहा खासियत
आलिशान प्रवास
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 7:43 PM

नवी दिल्ली : देशातील आतापर्यंतच्या सर्वात लांब नदी प्रवासासाठी गंगा विलास क्रूझ (Ganga Vilas Cruise) काशीला पोहचले आहे. या आलिशान क्रूझमध्ये स्विसचे 31 प्रवाशी पण हा रोमांचक सफर (Journey) अनुभवणार आहेत. देशातील सर्वात लांब म्हणजे 3200 किलोमीटरच्या नदी यात्रेसाठी (Luxury Life On River) दोन दिवसांनी हा प्रवास सुरु होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व्हर्चुअली या प्रवाशाला हिरवा झेंडा दाखवतील. हे क्रुझ काशी येथून असम राज्यातील डिब्रुगढसाठी रवाना होईल. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल हे उपस्थित असतील.

हा रोमांचक प्रवास 51 दिवस सुरु राहील. हे क्रूझ 3200 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या प्रवासात स्विस नागरीक काशी ते असममधील डिब्रुगढ दरम्यान प्रवास करतील. 18 रुम असलेल्या या क्रूझवर सर्वच लक्झरिअस सोयी-सुविधा आहेत.

हे सुद्धा वाचा

स्विस प्रवाशी एअर इंडियाच्या विमानाने दाखल झाले आहेत. नृत्य आणि संगिताने त्यांचे स्वागत करण्यात आले. बाबतपूर येथून त्यांना रामनगर येथील बंदरावर नेण्यात येणार आहे. तिथून त्यांचा क्रूझवरील प्रवास सुरु होईल. हे परदेशी पाहुणे 13 जानेवारी रोजी त्यांच्या आलिशान सफरीवर निघतील.

गंगा विलास हे क्रूझ भारतात तयार करण्यात आलेले आहे. या जबरदस्त प्रवासात हे क्रूझ भारत आणि बांगलादेशाच्या एकू्ण 27 नद्यांच्या पात्रात प्रवास करेल. 50 हून अधिक ठिकाणी ही यात्रा थांबणार आहे.  त्याठिकाणी सांस्कृतिक ठेवा परदेशी पाहुण्यांना पाहता येईल.

हे क्रूझ राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यादरम्यान प्रवास करेल. यामध्ये सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा नॅशनल पार्कचाही समावेश आहे. प्रवाशांच्या मनोरंजनाची खास सोय या क्रूझवर आहे. प्रवाशांना कंटाळा येऊ नये यासाठी क्रूझवर संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.