मुंबई : आपल्या स्वयंपाकघरात अशा बर्याच भाज्या आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठीही खूप महत्वाच्या आहेत. लसूण त्यापैकीच एक आहे. बहुधा आपण सर्वच भाज्यांमध्ये चवीसाठी लसूण वापरतो. परंतु, हे एक प्रकारचे औषध देखील मानले जाते. कारण, लसूण खाल्ल्याने आपला बर्याच आजारांपासून बचाव होतो. हे आपल्या केसांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे (Garlic Benefits For healthy hair growth).
वास्तविक, लसूणमध्ये अॅलिसिन नावाचा घटक असतो, जो एक चांगला अँटी-ऑक्सिडंट देखील मानला जातो. याशिवाय कार्ब 21, लोह, सल्फरिक अॅसिड, प्रथिने आणि जीवनसत्त्वे अ, बी, सी, ई यासह इतर अनेक पोषक घटक देखील असतात, जे आपल्या शरीरास अनेक रोगांपासून वाचवतात.
लसणाच्या वापरामुळे केसांची वाढ, अॅलोपेशीयावर मात आणि डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आज आम्ही आपल्याला लसणाच्या अशाच काही फायद्यांविषयी सांगणार आहोत…
आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लसूण आपल्या केसांची वाढ मोठ्या प्रमाणात सुधारण्यात मदत करते. केसांची वाढ सुधारण्यासाठी आपल्याला लसणाचे तेल बनवणे आवश्यक आहे. तेल तयार करण्यासाठी लसणाच्या दहा पाकळ्या सोलून, सोबत एक कांदा देखील सोलून घ्या. आता दोघांची एकत्र पेस्ट तयार करा. आता कढईत अर्धा कप तेल टाकून ते गरम करा. (तुम्ही ऑलिव्ह, एरंडेल किंवा नारळ तेल आवडीनुसार निवडू शकता) या तेलात लसूण आणि कांद्याची पेस्ट घाला. ही पेस्ट तपकिरी होईपर्यंत व्यवस्थित तळा. यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. नंतर हे तेल गाळून घ्या आणि या तेलाने स्काल्पवर मालिश करा. आठवड्यातून तीन वेळा असे केल्याने तुमच्या केसांची वाढ लवकर होते (Garlic Benefits For healthy hair growth).
अॅलोपेशीया हा एक प्रकारचा केसांचा संसर्ग आहे. यामध्ये आपले एकाच जागेहून बरेच केस नष्ट होतात आणि लसूण या समस्येवर खूप प्रभावी आहे. दररोज, लसूणचा रस काढा आणि तो रस केस नसलेल्या स्काल्पच्या भागावर लावा. अर्धा तास तो रस केसांमध्ये राहू द्या. त्या नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. 2 ते 3 महिने नियमित याचा वापर करा. याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
आजकाल बऱ्याच लोकांना केसांत कोंडा होण्याची समस्या आहे आणि ही समस्या आता खूप सामान्य झाली आहे. यापासून मुक्त होण्यासाठी आपण लसणाच्या दहा कळ्या व्यवस्थित सोलून घ्या. याच बरोबर दोन इंचाचा आल्याचा तिकडा सोलून घ्या. आता दोन्ही घटकांची एकत्र बारीक पेस्ट करा. त्यानंतर नारळ किंवा ऑलिव्ह तेल गरम करून, त्यात पेस्ट घाला आणि तपकिरी होईस्तोवर तळा. यानंतर ते तेल थंड होईस्तोवर बाजूला ठेवा. थंड झाल्यावर आठवड्यातून तीनदा या तेलाने आपल्या स्काल्पची मालिश करा.
(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Garlic Benefits For healthy hair growth)
Hair Care | केसांच्या आरोग्यासाठी लाभदायी ‘नारळाचे तेल’, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…#HairCare | #HairCareTips | #coconutoil https://t.co/GCtwMbedRP
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 29, 2021