गिझर की हिटर रॉड घ्यावा? खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

गरम पाण्यासाठी गिझर घ्यावा की हिटर रॉड? हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? मग चिंता करू नका. आम्ही आज तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

गिझर की हिटर रॉड घ्यावा? खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 8:00 AM

Geyser Vs Immersion Rod : हिवाळा सुरु झाला की थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी आपली खरेदी सुरु होते. मग गिझरपासून ते अगदी गरम कपड्यांपर्यंत आपण सर्व काही घेतो. पण, पाणी गरम करण्यासाठी काय घ्यावं, गिझर योग्य की हिटर रॉड, हा देखील प्रश्न अनेकदा विचारला जातो, याचंच उत्तर आज आम्ही देणार आहोत. तुम्ही यातील फरक फायदे-तोटे, अशा सर्व गोष्टी अगदी विस्ताराने जाणून घ्या.

गिझर आणि हिटर रॉड दोघांचेही स्वतःचे फायदे आहेत. रॉड स्वस्त आणि पोर्टेबल आहे. तर गिझर अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित आहे. गिझर जास्त तास आणि जास्त पाण्यासाठी चांगला आहे. तर रॉड कमी बजेटसाठी आणि विजेची बचत करण्यासाठी चांगला आहे. याविषयी अधिक सविस्तर जाणून घ्या.

हिटर रॉड किंवा गिझर, या दोघांचेही स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. हे आपल्या गरजा आणि बजेटनुसार वेगवेगळे दिसून येतील. हिटर रॉड बजेट-अनुकूल आणि पोर्टेबल आहे. तर गिझर दीर्घ कालावधीसाठी सोयीस्कर आणि अधिक सुरक्षितता देतो. हिवाळ्यात गरम पाण्यासाठी हिटर रॉड आणि गिझर दोन्ही लोकप्रिय पर्याय आहेत. पण या दोघांमध्ये काय फरक आहे आणि कोणी खरेदी करावे, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याची सविस्तर तुलना करुया.

हिटर रॉड

किंमत: हिटर रॉडची किंमत 300 ते दीड हजार रुपयांपर्यंत आहे. विशेषत: विद्यार्थी आणि लहान कुटुंबांसाठी हा बजेट-फ्रेंडली पर्याय आहे. विजेचा वापर: साधारणपणे 1.5 ते 2.0 किलोवॅट विजेचा वापर होतो. यात प्रति तास दीड युनिट वीज वापरली जाते. पोर्टेबिलिटी: हे कोठेही नेले जाऊ शकते आणि हलके आणि कॉम्पॅक्ट आहे. उपयोग: एक बादली पाणी 10-15 मिनिटांत गरम करू शकता. लहान कुटुंबे किंवा प्रवासासाठी उपयुक्त. त्रुटी: पाण्यात व्यवस्थित लावण्याची गरज आहे. खबरदारी न घेतल्यास शॉक लागण्याचा धोका असू शकतो.

गिझर

किंमत: 3 हजार ते 15 हजारापर्यंत गिझरची किंमत जास्त असली तरी ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे. विजेचा वापर: इन्स्टंट गिझरमध्ये 3-5 किलोवॅट विजेचा वापर होतो. तर स्टोरेज गिझरमध्ये 2-3 किलोवॅट वीज लागते. त्यात रॉडपेक्षा जास्त वीज खर्च होते. सुविधा: बटण दाबताच पाणी गरम होते. इन्स्टंट गिझर लहान कुटुंबांसाठी आदर्श आहे आणि स्टोरेज गिझर मोठ्या कुटुंबांसाठी आदर्श आहे. फीचर्स: गिझरमध्ये टेंपरेचर कंट्रोल, पॉवर इंडिकेटर आणि पीयूएफ इन्सुलेशन सारखे फीचर्स मिळतात. त्रुटी: पाणी तापवण्यासाठी हा एक महागडा पर्याय आहे. त्याचा वापर करण्यासाठी अधिक जागेची आवश्यकता असते.

काय खरेदी करावे?

बजेट: बजेट कमी असेल तर हिटर रॉड चांगला असतो. दीर्घ काळासाठी: जर आपल्याला दीर्घकालीन वापराची आवश्यकता असेल तर गीझर हा एक चांगला पर्याय आहे. विजेचा वापर: विजेची बचत करण्यासाठी हिटर रॉड चांगला आहे. पाण्याची गरज: मोठ्या प्रमाणात पाणी तापवण्यासाठी गिझर उपयुक्त आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.