मुंबई : चरबी (Fat) ही शरीरासाठी घातक असते. त्यामुळे अनेक जण कमी चरबीयुक्त किंवा चरबी नसलेले पदार्थ खाणं सुरु करतात. मात्र काही चरबीयुक्त पदार्थ खाणं हे शरीरासाठी चांगलं असते, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञ वंदना गुप्ते यांनी दिली आहे. (Good fat vs Bad fat Food Items for Healthy lifestyle)
आरोग्यतज्ज्ञ वंदना गुप्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही चरबीयुक्त पदार्थ हे शरीरासाठी घातक असतात. त्यामुळे शरीराची LDL पातळी वाढते. ही पातळी वाढल्याने कॅन्सर, डायबिटीस, लठ्ठपणा किंवा हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग होतात.
मात्र काही चरबीयुक्त पदार्थ हे शरीरासाठी फार गरजेचे असतात. याला Good Fat किंवा Healthy Fat असे म्हटलं जाते. याप्रकराचे फॅट हे फक्त शरीरासाठी नव्हे तर मेंदूच्या कार्यासाठीही खूप गरजेचे असतात. यात विटॅमिन A, D, E आणि K असतात. त्यामुळे त्याचा आपल्या शरीरासाठी फार फायदा होतो.
विशेष म्हणजे अशाप्रकारचे फॅटमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपल्या नियमित आहारात 15 ते 20 टक्के Good Fat असणे गरजेचे आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
लठ्ठपणा, डायबिटीस यासारख्या आजारांच्या भीतीमुळे अनेकजण चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळतात. मात्र त्यामुळे त्यांच्या शरीरावर घातक परिणाम होतात. तसेच शरीरातील पेशींच्या पडद्यावरही याचा वाईट परिणाम दिसतात.
चरबीयुक्त पदार्थ न खाल्ल्याने त्याचा केस आणि त्वचेवरही परिणाम होतो. कमी चरबीयुक्त किंवा चरबी नसलेले पदार्थ न खाणे यामुळे मूड स्विंग्स होण्याची समस्या जाणवते.
‘हे’ पदार्थ खाणे टाळा
‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा
(Good fat vs Bad fat Food Items for Healthy lifestyle)
संबंधित बातम्या :
Weight lose Tips | या गोष्टी आहारात घ्या…वजन कमी करण्यास होईल मदत!
Egg Benefits | अंड्याचा केवळ पांढरा भाग खाताय? थांबा, पिवळ्या बलकाचे ‘हे’ मोठे फायदे जाणून घ्या!