Health | खाण्यापिण्याच्या या सवयी बदला नि कोरोनाकाळात फुफ्फुसाची काळजी घ्या!
कोरोनामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये बदल होतो. प्रथिनांच्या प्रमाणात असामान्य बदल होतात आणि या पेशींमध्ये प्रथिनांच्या फॉस्फोरिलेशनचं प्रमाण वाढतं.
मुंबई : जवळजवळ गेल्या वर्षभरापासून, कोरोना विषाणूमुळे जगभरात कोलाहल माजला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी अनेक नियम व उपाय सांगितले जात आहेत. वास्तविक, कोरोना विषाणू नाक, तोंड आणि डोळे यांच्या मदतीने आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो आणि ऑक्सिजन प्रक्रियेस अडथळा आणतो. यामुळे एखाद्या व्यक्तीस श्वास घेण्यात त्रास होतो आणि कधीकधी परिस्थिती इतकी गंभीर होते की त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागते (Good Food habits for healthy lungs during corona pandemic).
अशा परिस्थितीत कोरोना रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती बळकट करण्याबरोबरच आपण आपले फुफ्फुस निरोगी आणि मजबूत देखील केले पाहिजे. जेणेकरुन आपण कोरोना विषाणूच्या या लढाईत आपण यशस्वी होऊ शकू. परंतु, यासाठी उत्तम आहारा व्यतिरिक्त आपल्याला काही सवयी देखील कटाक्षाने टाळाव्या लागतील.
जास्त मीठ खाण्याची सवय बदला
मीठामुळे अन्नाची चव वाढते. सगळ्या अन्न पदार्थात मीठ हे टाकलेच जाते. परंतु, त्याचे जास्त सेवन करणे आरोग्यास हानिकारक आहे. फुफ्फुस आणि हृदयासंबंधित समस्या टाळण्यासाठी आहारात मर्यादित प्रमाणात मिठाचा समावेश करा.
मद्यपान टाळा
अल्कोहोलमध्ये उपस्थित असलेल्या इथेनॉलचा आपल्या फुफ्फुसांच्या पेशींवर परिणाम करतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे न्यूमोनिया आणि फुफ्फुसांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. आपण दम्याचे रुग्ण असाल तर, ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. म्हणूनच, अल्कोहोल सेवन करणे पूर्णपणे टाळा (Good Food habits for healthy lungs during corona pandemic).
‘प्रोसेस्ड मीट’मुळे सुजेची समस्या
प्रक्रिया केलेले मांस अर्थात ‘प्रोसेस्ड मीट’चे जास्त प्रमाणात सेवन केल्याने फुफ्फुसात सूज आणि मोठ्या प्रमाणात तणाव यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे ‘प्रोसेस्ड मीट’ खाणे टाळा. तसेच तळलेले भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
शुगरी ड्रिंक्स
बाजारात विकले जाणारे कार्बोनेटेड शुगरी ड्रिंक्स आपल्या सगळ्यांनाच आवडतात. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने ते खूप हानिकारक आहेत. अशा प्रकारच्या पेयांचे जास्त सेवन केल्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढते, फुफ्फुसांचा त्रास निर्माण होतो, हे बर्याच प्रकरणांमध्येही दिसून आले आहे.
कोरोनामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये बदल
कोरोनामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये बदल होतो. प्रथिनांच्या प्रमाणात असामान्य बदल होतात आणि या पेशींमध्ये प्रथिनांच्या फॉस्फोरिलेशनचं प्रमाण वाढतं. हे असामान्य बदल आहेत. याशिवाय यामुळे विषाणूंची संख्या वाढवण्यास मदत होते. कालांतराने विषाणू पेशी नष्ट करतात. त्यामुळे फुफ्फुसाला इजा होते, असं वैज्ञानिकांनी सांगितलं.
(Good Food habits for healthy lungs during corona pandemic)
हेही वाचा :
रिकव्हर झाल्यानंतर मासिक पाळीवर परिणाम करतोय कोरोना, ‘या’ समस्यांनी महिला हैराण!#CoronaEffect | #coronavirus | #MenstrualCycle | #Healthhttps://t.co/5zkj8PlxRP
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2021