Good Habits | जमिनीवर बसून जेवण्याचे ‘हे’ फायदे वाचाल, तर टेबल-खुर्चीला ‘गुडबाय’ म्हणाल!
आपले पूर्वज आणि घरातील इतर वडीलधरी मंडळी छान मांडी घालून, जमिनीवरच जेवायला बसायचे, याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी होता.
मुंबई : पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करण्याची आपल्याला इतकी सवय लागली आहे की, आपणा आपल्या काही संस्कृती आणि प्रथा विसरत चाललो आहोत. या सगळ्याच्या आपल्या जीवनशैलीवर देखील मोठा परिणाम होत आहे. यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीपासून ते थेट खाण्यापिण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. आजकाल जेवण आणि नाश्ता देखील खुर्ची-टेबलवर बसून खाल्ले जाते. यामुळे दिवसेंदिवस आपले शरीर आळशी आणि स्थूल बनत चालले आहे. आपले पूर्वज आणि घरातील इतर वडीलधरी मंडळी छान मांडी घालून, जमिनीवरच जेवायला बसायचे, याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी होता. जमिनीवर बसून अन्न ग्रहण करण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया हे फायदे…(Good Food Habits sit on the floor while eating any thing)
जमिनीवर मांडी घालून अन्न ग्रहण करण्याचे फायदे :
– खाली जमिनीवर मांडी घालून बसून अन्न ग्रहण करणे ही एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. वैज्ञानिक दृष्ट्या देखील ही पद्धत अगदी आरोग्यपूर्ण असल्याचे सिद्ध झाले आहे. जमिनीवर जेवायला बसताना आपण मांडी घालून बसतो. या आसनाला ‘सुखासन’ म्हणतात. आयुर्वेदानुसार शांत चित्ताने आणि शांतीपूर्ण वातावरणात अन्न ग्रहण केल्याने पचन सुधारते.
– सुखासनात बसून अन्न ग्रहण केल्याने शरीर मजबूत, सक्रिय आणि स्वस्थ राहते, म्हणून नेहमी जमिनीवर बसूनच जेवावे. असे केल्याने पाठीचे आणि मणक्याचे स्नायू व पेल्विस सक्रिय राहते.
– या आसनात बसून जेवताना आपले संपूर्ण शरीर नैसर्गिक अवस्थेत राहते. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तसेच नाडीतंत्र देखील उत्कृष्ट कार्य करते.
– याशिवाय कुटुंबासोबत एकत्र बसून जेवल्याने नातेसंबंधातही मधुरता निर्माण होते. तसेच परस्पर संबंध देखील सुधारतात (Good Food Habits sit on the floor while eating any thing).
– फरशीवर बसून जेवल्याने पाठीचा खालचा भाग ताठ राहतो आणि व्यवस्थित ताणला जातो. मात्र, खुर्चीवर बसल्याने शरीराची हालचाल होत नाही.
– पाठीचा कणा ताठ ठेवून जेवल्याने, अन्न व्यवस्थित पचन होते. यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते.
– या दरम्यान शरीराच्या खालच्या भागातील मांसपेशी नैसर्गिकरीत्या ताणल्या जातात. यामुळे त्या मजबूत देखील होतात.
– पाठ ताठ राहिल्याने मणक्याचे हाड मजबूत होते आणि शरीराचे संतुलन टिकून राहते. यामुळे व्यक्तिमत्वातही सुधारणा होते.
– तसेच रक्त परीसंचरण सुरळीत राहिल्याने हृदय निरोगी राहते. यामुळे हृदयासंबंधित समस्या उद्भवत नाहीत.
– मांडी घालून बसल्याने गुडघ्यांचा व्यायाम देखील होतो. यामुळे पायाची हाडे मजबूत होतात.
(Good Food Habits sit on the floor while eating any thing)
हेही वाचा :
Peanuts Side Effects | शेंगदाण्याच्या अति सेवनाने होऊ शकते आरोग्याचे नुकसान, वाचा याचे दुष्परिणाम#peanuts | #health | #sideeffects | #Foodhttps://t.co/9IaOiIQxZ1
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2021