मुंबई : आपल्या घरातील स्वयंपाकघरांत वापरले जाणारे मसाले आणि तेल हे एखाद्या आयुर्वेदिक घटकाप्रमाणे आहेत. ज्यामुळे आपल्या शरीराला आणि आरोग्याला बरेच फायदे आहेत. यापैकीच एक असणारे मोहरीचे तेल हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. भारतातील प्रत्येक घरांच्या स्वयंपाकघरात हे तेल सहज उपलब्ध आहे. मोहरीचे तेल जाडसर असते आणि तीक्ष्ण गंधाने अन्नाला चांगली चव देते. याचा वापर बहुतेकवेळा स्वयंपाक करताना केला जातो (Good Health benefits of mustard oil).
मात्र, केवळ खाण्यासाठीच नाही तर, मोहरीचे तेल त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून देखील उपयोगी आहे. पण, तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत काय? आज आम्ही तुम्हाला मोहरीच्या तेलाच्या अशाच काही विस्मयकारक फायद्यांविषयी सांगणार आहोत. आपल्या नियमित आहारात याच्या वापरामुळे आपण अनेक प्रकारच्या रोगांपासून दूर राहू शकता.
मोहरीच्या तेलामध्ये पिग्मेंट म्हणजेच अॅलिसल आइसोथिओसायनेट हा घटक मुबलक प्रमाणात आढळतो. ज्याचा शरीरातील वेदनांवर खूप शक्तिशाली परिणाम होतो, असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त, हे तेल अल्फा-लिनोलेनिक अॅसिड, ओमेगा -3 फॅटी अॅसिडने देखील समृद्ध आहे, ज्यामुळे तीव्र वेदना कमी होऊ शकतात. मोहरीचे तेल संधिवातावर देखील आराम देऊ शकते.
मोहरीचे तेल विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ थांबवू शकते आणि त्याचा पुढील संसर्ग रोखण्यास सक्षम आहे. म्हणून, याचा उपयोग शरीरावर किंवा अप्रत्यक्षपणे केला जाऊ शकतो, तो दोन्ही प्रकरणांमध्ये फायदेशीर आहे. हे बॅक्टेरियाच्या प्रभावांना तटस्थ बनवणारे म्हणून ओळखले जाते आणि आपल्या शरीरातील संसर्गाची वाढ थांबवण्यात देखील मदत करते (Good Health benefits of mustard oil).
कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींपेक्षा वेगाने वाढतात. बर्याच संशोधनात असे आढळले आहे की मोहरीचे तेल शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करते आणि कोणत्याही गंभीर स्थितीस प्रतिबंध करते.
सामान्य पातळीपेक्षा ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे, हे आरोग्यास धोकादायक जीवनशैली असू शकते. अशा वेळी मोहरीचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खाद्य तेलामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. यामुळे, हे तेल रक्तदाब कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास मजबूत ठेवण्यास उपयुक्त आहे.
मोहरीच्या बियांनी त्वसेस चकाकी येते. मोहरीच्या त्वचा ग्लोईंग करता येते. मोहरीचे तेल त्वचेस तरूण राखण्यास मदत करते. ड्राय स्किन असल्यास मोहरीच्या बीया चांगला उपाय मानला जातो. मोहरीच्या बियांमध्ये सल्फर तसेच, अँटी फंगल हे घटक असल्याने चेहऱ्यावर होणाऱ्या इनफेक्शनला दूर ठेवण्यासाठी लाभदायक ठरते. मोहरीच्या तेलात तसेच बियांमध्ये कॅरोटीन आणि ल्यूटिन हे घटक असल्याने अँटी-ऑक्सिडेंट तयार करतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असल्याने हे त्वचेवर अँटी-एजिंगप्रमाणे काम करते आणि त्वचेस तारूण्या प्राप्त होते.
(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Good Health benefits of mustard oil)
Indoor Plants | ‘या’ इनडोअर वनस्पती तुम्हाला हवेतील विषारी घटकांपासून ठेवतील दूर#indoorplants #lifestyle #NASA #life https://t.co/TvnHZlqzyd
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2020