Fitness Tips : कमी वेळात जास्त वजन कमी करायचं आहे?, ‘हे’ Superfood ट्राय करा

ग्रीन कॉफीमुळे तुमची रोगप्रतीकारक शक्ती मजबूत राहाते. यामुळे तुमचं मेटॅबॉलिज्म नियंत्रित राहातं. त्यामुळे प्रकृती चांगली राहाते.

Fitness Tips : कमी वेळात जास्त वजन कमी करायचं आहे?, 'हे' Superfood ट्राय करा
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 3:53 PM

मुंबई : जर तुम्ही वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात आणि व्यायाम, जिम, एरोबिक्स, झुंबासारखे (Green Coffee Benefits) अनेक प्रयत्न करुनही तुमचं वजन कमी होत नाहीये. तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एक सुपरफूडबाबत सांगणार आहोत जे आरोग्याच्या दृष्टीने खजाना आहे. हे सुपरफूड म्हणजे ग्रीन कॉफी (Green Coffee). ग्रीन कॉफी जलद गतीने वजन कमी करण्यात मदत करते तसेच, अनेक आजारांपासूनही तुमचा बचाव करते (Green Coffee Benefits).

शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यात मदत करते (Helpful to Remove Extra Fat from Body)

मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असलेली ग्रीन कॉफी शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यात मदत करते. जर तुमचं वजन जास्त असेल तर सकाळी उपाशी पोटी आणि दुपारी जेवणापूर्वी याचं सेवन करा. ग्रीन कॉफी पिल्यानंतर जवळपास अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका. जर तुम्हाला जास्त वजन कमी करायचं नसेल तर सकाळी एकदा याचं सेवन करा.

रोगप्रतीकारक शक्ती मजबूत करते(Makes Immune System Strong)

ग्रीन कॉफीमुळे तुमची रोगप्रतीकारक शक्ती मजबूत राहाते. यामुळे तुमचं मेटॅबॉलिज्म नियंत्रित राहातं. त्यामुळे प्रकृती चांगली राहाते. त्याशिवाय, ग्रीन कॉफी पिल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्ऱॉल, हृदयासंबंधी तक्रारी, अल्झायमर आणि कॅन्सरसारख्या रोगांपासून बचाव होतो. ग्रीन कॉफी शरीरातील विषारी तत्त्वांना बाहेर काढण्यात मदत करते. अनेक आरोग्यदायी गुणांमुळे याला सुपरफूड म्हटलं जातं.

ग्रीन कॉफी कशी तयार कराल (How to prepare Green Coffee)

बाजारात दोन प्रकारच्या ग्रीन कॉफी मिळतात. एकामध्ये हिरव्या बिया असतात आणि दुसरं म्हणजे पावडर. तुम्ही ग्रीन कॉफी ऑनलाईनही ऑर्डर करु शकता. जर तुम्ही बियाणांचा वापर करत आहात, तर रात्रभर एक चमचा बिया पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी या पाण्याला कमी गॅसवर उकळी येऊ द्या. त्यानंतर गाळून कोमट झाल्यावर प्या.

जर तुम्ही पावडरचा वापर करत आहात तर याला भिजवण्याची गरज नाही. यासाठी पाणी उकळून घ्या आणि त्यामध्ये एक चमचा पावडर मिसळा आणि कोमट असताना प्या (Green Coffee Benefits).

ग्रीन कॉफीचा वापर करताना काय लक्षात ठेवावं

– ग्रीन कॉफीमध्ये साखरेचा जराही वापर करु नका. जर गरज वाटलीच तर मध वापरा

– ग्रीन कॉफीचं सेवन दिवसातून दोनपेक्षा अधिक वेळा करु नका. यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होण्याची भीती असते.

– ग्रीन कॉफीचं सेवन केल्याने तसं तर कुठलीही समस्या उद्भवत नाही, पण काही जणांना मळमळ होणे, डोकेदुखी, पोट खराब होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. असे झाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

– ग्रीन कॉफीचा वापर जास्त काळ करु नका. एक किंवा दोन महिन्यातच चुमचं वजन कमी होईल, त्यानंतर याचं सेवन थांबवा, नाहीतर तुम्हाला आणखी काही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

Green Coffee Benefits

टीप : ग्रीन कॉफीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

संबंधित बातम्या :

Skin Care | त्वचेच्या आरोग्यासाठी ‘व्हिटामिन ए’युक्त आहार महत्त्वाचा, डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ घटक!

Turmeric Milk | हंगामी ताप, सर्दी आणि खोकल्याशिवाय हळदीचे दूध ‘या’ आजारांमध्ये प्रभावी!

मिठाई खायची इच्छाय, पण शुगरचा प्रॉब्लेम? नो टेन्शन ही फळं ट्राय करा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.