मुंबई : आपल्या सर्वांना पेरुच्या फायद्यांविषयी माहिती आहे. हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरूचे सेवन केल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. पण, तुम्हाला माहिती आहे का की, केस आणि त्वचेसाठी लाभदायी म्हणून पेरूची पाने देखील वापरली जातात. त्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, जे त्वचेच्या संसर्गाची समस्या रोखतात. पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेच्या खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्याचे काम करतात (Guava Leaves amazing skincare benefits know how to use).
पेरूच्या पानांमध्ये पोटॅशियम, फॉलिक आम्ल असते. हे घटक आपल्या त्वचेसाठी हे सुपरफूड आहेत. जर मुरुम, पिटिकांचे डाग, पिग्मेंटेशन आणि अकाली वृद्धत्वाच्या खुणा या समस्येमुळे आपण त्रस्त असाल, तर आम्ही आपल्याला पेरू पानांचे घरगुती उपचार सांगणार आहोत. ज्याचा अवलंब करून आपण या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. चला तर, त्या उपायांबद्दल जाणून घेऊया…
जर, आपल्याला ब्लॅक हेड्सचा त्रास होत असेल, तर पेरूची पाने बारीक पेस्ट करून चेहर्यावर लावावीत. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि नंतर स्क्रबप्रमाणे संपूर्ण चेहरा घासून घ्या. आठवड्यातून दोन वेळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास ब्लॅक हेड्सची समस्या दूर होईल.
चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी, दररोज पेरूची पाने बारीक वाटून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.
पेरूच्या पानांमधे असलेले अँटी-ऑक्सिडेंट वृद्धापकाळाच्या रेषा आणि फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. तसेच, ते आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यासाठी देखील मदत करतात.
कोरड्या व निर्जीव त्वचेपासून मुक्त होऊ इच्छित असल्यास, पेरूच्या पानांची पेस्ट चेहर्यावर लावा. ही पेस्ट व्यवस्थित कोरडी झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा (Guava Leaves amazing skincare benefits know how to use).
चमकदार केस
पेरूच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे आपले केस चमकदार बनवण्यास मदत करते. पेरूच्या पानांमध्ये व्हिटामिन बी आणि सी असते, जे स्काल्पचे खोलवर पोषण करते.
केसांची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी स्काल्प मजबूत असणे गरजेचे असते. पेरूच्या पानांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे स्काल्पला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
दररोज पेरूची पाने खाल्याने कोलेस्टेरॉल देखील कमी होतो. शरीरात रक्त परिसंचरण चांगले राहते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो. जर पेरुच्या पानांचा काढा डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पिण्यास दिला तर, त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित होते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे सर्व त्रास दूर होतात. हंगामी सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे अशा समस्या निर्माण होत असतील, तर पेरुच्या पानांचा रस दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावा. याने बराच आराम मिळतो.
(Guava Leaves amazing skincare benefits know how to use)
Teeth Whitening | दातांचा पिवळेपणा 2 मिनिटात दूर करण्यासाठी भन्नाट टिप्स!
कापूराचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत? वाचा…
World Obesity Day | तुमच्या ‘या’ सवयी ठरतात लठ्ठपणाच्या समस्येला कारणीभूत, त्वरित बदलण्याची गरज!#obesity | #obesityDay | #Health | #Food | #habits https://t.co/v6rEKIvZws
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 4, 2021