Hair Care | हिवाळ्याच्या दिवसांत कोंड्याच्या समस्येने हैराण? ‘हे’ घरगुती उपचार नक्की ट्राय करा!

हिवाळ्यात आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. या हवामानात थंड वाऱ्यांमुळे आपली स्काल्प सुकते आणि केसांमध्ये खाज सुटणे सुरू होते.

Hair Care | हिवाळ्याच्या दिवसांत कोंड्याच्या समस्येने हैराण? ‘हे’ घरगुती उपचार नक्की ट्राय करा!
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 11:16 AM

मुंबई : हिवाळ्यात आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. या हवामानात थंड वाऱ्यांमुळे आपली स्काल्प सुकते आणि केसांमध्ये खाज सुटणे सुरू होते. या हंगामात केसातील कोंड्याची समस्या सामान्य आहे. कोंड्याच्या समस्येमुळे आपले केस तुटतात आणि विरळ होऊ लागतात. केसांतील कोंडा ही एक समस्या आहे, जी एकदा झाली की सहसा पटकन दूर होत नाही. बरेच लोक यावर अनेक उपाय सांगतात. मात्र, हे उपाय कधी कधी काम करत नाहीत (Hair care Home Remedies for dandruff problem).

केसांतील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी, बाजारात मिळणारे अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरू शकता. तसेच, या समस्येवर उपचार म्हणून अनेक प्रकारची केसांची उत्पादने बाजारात सध्या उपलब्ध आहेत. या गोष्टी करुनही कोंड्याची समस्या दूर होत नसेल तर, आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत. ज्याचा उपयोग करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात सहज उपलब्ध असतो. केसांतील कोंडा कमी करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. स्काल्पला एक्सफोलिएट करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरू शकतो. बेकिंग सोड्यामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे स्काल्पवरील लालसरपणा, खाज सुटण्यासारख्या समस्या कमी होतात.

कडुलिंबाचा रस

कडुलिंब जसे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी आहे, तसेच ते केसांच्या आरोग्यासाठी देखील गुणकारी आहे. कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी सेप्टिक, अँटी वायरल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत. अँटी फंगल गुणधर्मांमुळे केसांतील कोंडा कमी करण्यासाठी कडुनिंब हे सर्वात प्रभावी माध्यम ठरते (Hair care Home Remedies for dandruff problem).

कोरफड

कोरफडमध्ये अँटी-फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे स्काल्पला एक्सफोलीएट करण्यास मदत करतात. कोरफड आपल्या स्काल्पला मॉइश्चराइझ करते. यासाठी नियमित कोरफड जेलचा वापर करा. यासाठी कोरफडीचा ताजा गर किंवा बाजारात मिळणारे कोरफड जेल वापरू शकता. अंघोळीपूर्वी केसांमध्ये कोरफड जेल लावा आणि साधारण 20 मिनिटांनंतर केस धुवून टाका.

पौष्टिक अन्न

निरोगी शरीर आणि केसांच्या योग्य वाढीसाठी, सकस आणि पौष्टिक आहार घ्यावा. पौष्टिक आहार शरीराला निरोगी ठेवण्याप्रमाणेच, स्काल्प मजबूत करण्यास देखील मदत करतो. यासाठी आपल्या आहारात अंडी, मासे आणि पालक यांचा समावेश करा.

(टीप : कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Hair care Home Remedies for dandruff problem)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.