Hair Care | केस गळती, कोंड्यासह केसांच्या अनेक समस्यांना दूर ठेवेल ‘जास्वंदाचे फूल’, वाचा याचे फायदे…

खराब जीवनशैलीचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावर होत नाही, तर त्याचा आपल्या केसांवरही वाईट परिणाम होतो.

Hair Care | केस गळती, कोंड्यासह केसांच्या अनेक समस्यांना दूर ठेवेल ‘जास्वंदाचे फूल’, वाचा याचे फायदे...
जास्वंदाचे फुल
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 2:55 PM

मुंबई : खराब जीवनशैलीचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावर होत नाही, तर त्याचा आपल्या केसांवरही वाईट परिणाम होतो. अयोग्य खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे आणि झोपेच्या अनिश्चित वेळेमुळे केस कमकुवत होऊ लागतात. तसेच, काही काळानंतर ते तुटतात आणि अकाली पांढरे देखील होऊ होतात. उर्वरित समस्या प्रदूषणामुळे देखील उद्भवतात (Hair Care Tips Using Jaaswand aka Hibiscus flower).

जर, आपल्या बाबतीतही असेच काही झाले असेल आणि आपण बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांचा वापर करून कंटाळला असाल, तर जास्वंदाचे फूल आपल्या केसांच्या आरोग्याचे पोषण करू शकते. जास्वंदाच्या फुलाचे तेल आणि त्याची पाने केसांच्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्त करू शकतात. तसेच, त्यांना मजबूत आणि चमकदार देखील बनवू शकतात. चला तर, त्याचे फायदे जाणून घेऊया…

केसांच्या समस्यांवर गुणकारी ‘जास्वंद’

– जास्वंद व्हिटॅमिन सीने समृद्ध असते. यात केसांच्या मुळांना बळकट करण्याची क्षमता असते. जर आपण या जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश केली, तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात. तसेच नवीन केसही वाढतात. जर आपण दररोज हे करू शकत नसाल तर आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस, या तेलाने नक्कीच मालिश करा.

– जास्वंदाच्या फुलामध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत. त्याच्या हेअर पॅकचा किंवा हेअर ऑईलचा वापर केल्याने स्काल्पवर जमा होणारे जीवाणू काढून टाकले जातात आणि खाज सुटणे, डोक्यातील कोंडा, मुरुम इत्यादीपासून मुक्ती मिळते (Hair Care Tips Using Jaaswand aka Hibiscus flower).

– जर तुमचे केस खूप कोरडे व निर्जीव दिसत असतील, तर मग जास्वंदाची फुले व पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवून केसांना सुमारे एक तासासाठी लावा. नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे काही दिवसांतच केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.

हेअर पॅक कसा बनवायचा?

गुणकारी जास्वंदाची फुले व पाने बारीक वाटून, त्यात थोडे दही मिसळा आणि केसांना सुमारे एक तास लावून ठेवा. यानंतर केसांना शाम्पू लावून केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. जर दही उपलब्ध नसेल, तर आपण केवळ फुले व पाने वाटून ती पेस्ट केसांना लावू शकता.

केसांचे तेल कसे तयार करावे?

हिबिस्कस अर्थात जास्वंदाची आठ फुले व आठ पाने घ्या आणि त्यांना चांगले धुवून, त्याची बारीक पेस्ट बनवा. आता एका सॉसपॅन/तव्यामध्ये एक कप नारळ तेल गरम करा आणि त्यात ही पेस्ट घाला आणि एकदा ढवळा. नंतर गॅस बंद करा आणि सॉसपॅनला थोड्यावेळासाठी झाकून ठेवा. थंड झाल्यावर, ते एका कंटेनरमध्ये भरा आणि आठवड्यातून किमान तीन दिवस केसांवर लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Hair Care Tips Using Jaaswand aka Hibiscus flower)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.