New Year Gift Ideas : हॅप्पी न्यू ईयर, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘या’ खास गिफ्ट आयडिया
नवीन वर्षात देण्यासाठी पॉकेट फ्रेंडली गिफ्ट आयडिया.(Special Gift Ideas for New Year)
मुंबई : लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. 2020 हे वर्ष चढउतारांचं वर्ष होतं, लॉकडाऊनमुळे आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेलो होतो. ऑनलाईन जगात आपल्या भेटीगाठी होत होत्या, सगळे सन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण साजरे केलेत. आता मात्र अनलॉकमध्ये जग पूर्वपदावर येत आहे आणि येत्या 2021 कडून सगळ्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे हे नवंवर्षाचं सेलिब्रेशन खास असणार आहे. आता मित्र-मैत्रिणी भेटणार म्हटल्यावर त्यांना गिफ्ट काय देणार हे टेंशन तुम्हाला आलंच असेल नाही का !, तर आम्ही तुम्हाला काही पॉकेट फ्रेंडली आयडिया देणार आहोत.
कस्टमाइझ वस्तू सध्या कस्टमाइझ वस्तूंचा ट्रेंड आहे. कुठल्याही वस्तूवर फोटो किंवा मोटिव्हेशनल कोट्स प्रिंट केलेलं गिफ्ट तुमच्या मित्र मैत्रिणींना तुम्ही देऊ शकता. जसे… मोबाईल कव्हर, फोटो फ्रेम, कॉफी मग, कि-चैन, ज्वेलरी बॉक्स इ. हे गिफ्ट्स स्पेशल ठरतील आणि पॉकेट फ्रेंडलीसुद्धा असतील.
बांबू ट्री घरात शोसाठी ठेवले जाणारे बांबू ट्री सुख आणि समृद्धीचं प्रतिक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे नव वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘बांबू ट्री’ एक उत्तम गिफ्ट ठरू शकतं. हे गिफ्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या आणि कुटुंबियांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल.
टेबल लॅम्प घरातील सजावटीच्या वस्तूंमध्ये टेबल लॅम्प नक्कीच असतो. त्यामुळे लॅम्प गिफ्ट करणं उत्तम ठरू शकतं. नवीन वर्षात तुम्ही जवळच्या मित्रांना आणि मैत्रिणींना लॅम्प गिफ्ट करू शकता. हवं असेल तर तुम्ही हे लॅम्प कस्टमाइझही करू शकता.
स्किनकेअर प्रोडक्ट्स सध्या स्वत:ची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यात हिवाळ्यात त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. त्यामुळे स्किनकेअर प्रोडक्ट्स गिफ्ट देणं जास्त स्पेशल ठरू शकतात.
चॉकलेट सेट्स चांगल्या गोष्टींची आणि दिवसाची सुरुवात ही गोड खाऊन केली जाते. त्यासाठी चॉकलेट्स गिफ्ट देणं हा उत्तम पर्याय आहे. कारण चॉकलेट हा असा गोड पदार्थ आहे जो लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो.
संबंधित बातम्या
Year End Party | सरत्या वर्षाची पार्टी घरच्या घरी आयोजित करताय? मग ‘ही’ रेसिपी नक्की ट्राय करा!
Indian Railway | पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेचे खास ‘व्हिस्टाडोम कोच’, पाहा याची वैशिष्ट्ये…