Headache | वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? जाणून घ्या या मागच्या कारणांबद्दल…

डोकेदुखी हा एक सामान्य रोग आहे, जो बहुतेक लोकांना त्रासदायक ठरतो. यामागे बरीच कारणे असू शकतात. कधीकधी, तणावग्रस्त आणि निराश झाल्यानंतरही डोक्यात वेदना होतात.

Headache | वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? जाणून घ्या या मागच्या कारणांबद्दल...
डोकेदुखी
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 1:02 PM

मुंबई : डोकेदुखी हा एक सामान्य रोग आहे, जो बहुतेक लोकांना त्रासदायक ठरतो. यामागे बरीच कारणे असू शकतात. कधीकधी, तणावग्रस्त आणि निराश झाल्यानंतरही डोक्यात वेदना होतात. डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परंतु, काहीवेळा आपल्या काही अज्ञात सवयींमुळेदेखील डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो. यासाठी आपल्या डोकेदुखीचे नेमके कारण काय आहे, ते जाणून घेऊया. हे टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे, यावरही विचार केला पाहिजे (Headache reasons and home remedies).

भुकेने डोकेदुखी

बर्‍याच लोकांना भूक मुळीच सहन होत नाही. जास्त काळ भूक लागल्यामुळे रक्तातील साखर कमी होते. ज्यामुळे आपल्याला डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. म्हणून आपण थोड्या-थोड्या वेळात काहीतरी खाणे चालू ठेवावे.

आईस्क्रीमही असू शकते कारण

काही लोकांना आईस्क्रीम खाण्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, हे ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. परंतु कधीकधी थंड गोष्टी फार पटपट खाल्ल्यामुळे तोंडाच्या पेशी आकुंचित होऊ लागतात आणि डोकेदुखीची समस्या उद्भवते. म्हणून थंड गोष्टी हळू हळू सावकाश खाव्यात.

सकाळ कॉफी न प्यायल्याने डोकेदुखी

जर आपल्याला दररोज चहा आणि कॉफी पिण्याची सवय असेल आणि जर आपल्याला एक दिवस ही पेय न मिळाल्यास, आपल्याला डोकेदुखी होऊ शकते. हे असे होते कारण, आपल्या शरीराला याची सवय होते आणि जेव्हा ती गोष्ट मिळत नाही, तेव्हा डोकेदुखी सुरू होते. अशा परिस्थितीत आपल्याला चहा आणि कॉफी पिणे सोडायचे असेल, तर हळू हळू या गोष्टींचे सेवन करणे थांबवा. त्याऐवजी आपण ग्रीन किंवा ब्लॅक टी पिऊ शकता.

चुकीच्या पद्धतीमध्ये झोपणे

जर आपण रात्रभर चुकीच्या स्थितीत झोपत असाल, तर सकाळी डोकेदुखी सुरू होते. तसेच, मानेत देखील खूप वेदना होऊ लागतात. म्हणून झोपेच्या आधी डोके व मान सरळ ठेवा आणि झोपा, म्हणजे डोकेदुखीचा संभाव्य त्रास टाळता येईल (Headache reasons and home remedies).

डोकेदुखीच्या समस्येवर काही घरगुती उपाय :

– अनेकदा तणावामुळे खूप डोकं दुखतं. अशावेळेस लवंग खूप उपयुक्त ठरते. लवंग आणि लवंगेच्या तेलात वेदनाशामक गुण असतात. 10-15 लवंगांची बारीक पूड करा. ही पूड एका कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. वेदना कमी होतात. दोन चमचे खोबरेल तेल, त्यामध्ये एक चमचा मिठ आणि चार-पाच थेंब लवंग तेल मिसळून ते हलक्या हाताने कपाळाला लावावं. याने त्वरीत आराम मिळतो.

– पुदिन्याची पानं आणि पुदिन्याच्या तेलात मेंथॉल असतं. ते मेंदुतील रक्तवाहिन्यांना मोकळं करण्यासाठी फायदेशीर ठरतं. एक चमचा जैतूनच्या तेलात पुदिन्याचा तेवढाच रस मिसळावा. त्यानंतर तो लेप कपाळाला लावल्यास डोकेदुखी गायब होते.

– आल्याचा उपयोग डोकेदुखीसाठी रामबाण म्हणून केला जातो. आल्यामुळे डोक्याच्या पेशींमध्ये आलेली सूज कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदात आल्याच्या गुणांवर विशेष भर देण्यात आला आहे. डोकेदुखी दूर पळवण्यासाठी आलं अत्यंत गुणकारी ठरतं. शिवाय याचे परिणामसुद्धा चकित करणारे आहेत. त्यासाठी तुम्हाला एक टीस्पून लिंबाचा रस आणि तेवढाच आल्याचा रस एकत्र करून ते मिश्रण सेवन करावं. दिवसातून दोनदा हे मिश्रण घेतल्याने डोकेदुखी दूर पळते. आल्याचा दुसरा उपाय करताना आल्याची एक चमचा पेस्ट बनवून त्यात दोन चमचे पाणी मिसळावं आणि ती पेस्ट कपाळावर लावावी. काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावी.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Headache reasons and home remedies)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.