हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…

काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात.

हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे...
काळी मिरी
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 5:13 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात एखाद्याला हवामान बदलामुळे खोकल्याची समस्या वारंवार येत असेल, तर कोरोनाच्या लक्षणांबद्दल मनात बर्‍याच गोष्टी येऊ लागतात. कोरोना संसर्गाची तीव्रता पाहता लोकांमध्ये सामान्य आजारांबद्दलही भीती वाढत आहे. यामुळे त्यांच्या मनावरही परिणाम होत आहे. जर आपल्यालाही अशी सर्दी-खोकल्याची समस्या वारंवार उद्भवत असेल, तर ‘काळीमिरी’चा वापर करून तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकता. काळीमिरी सेवन केल्याने 3 ते 4 दिवसांतच फरक दिसून येईल. काळीमिरी खोकल्याशिवाय, इतर बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते (Health benefits of Black Pepper).

काळ्यामिरीत पौष्टिक घटक

काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे स्वादासह काळीमिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे.

काळीमिरीचे प्रभावी उपाय :

– जर तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर, काळीमिरी गरम दुधात मिसळून सेवन करा.

– जर वारंवार सर्दी होत असेल तर, पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन असे प्रमाण करत नियमित 15 दिवस तर, त्या 15 दिवसांनी उतरत्या क्रमाने काळीमिरीचे सेवन करा. यामुळे वारंवार सर्दी होण्याची समस्या दूर होईल (Health benefits of Black Pepper).

– खोकला झाल्यास एक चमचा मधात चिमूटभर हळद आणि 2/3 काळीमिरी पूड करून मिसळून त्याचे सेवन करा.

– सतत खोकल्यामुळे त्रास होत असल्यास, काळीमिरीच्या 4-5 दाण्यांसह 15 मनुका चावून खाल्ल्याने आराम मिळेल.

– जर घसा बसला असेल, तर तूप, साखर आणि मिरपूड मिसळून त्याचे चाटण तयार करा.

– फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये संसर्ग झाल्यास आपण काळीमिरी आणि पुदीना युक्त चहा पिऊ शकता.

– जर आपल्याला खोकल्यामुळे त्रास होत असेल तर काळीमिरीची पूड गुळामध्ये मिसळा आणि गोळ्या बनवा. या गोळ्या चघळल्याने आराम मिळेल.

– वारंवार गॅसची समस्या उद्भवत असेल, तर एक कप पाण्यात अर्धा लिंबाचा रस, अर्धा चमचा मिरपूड आणि अर्धा चमचे काळे मीठ टाकून प्या.

– अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर, लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन त्यातील बिया काढून टाका. त्यात काळे मीठ आणि मिरपूड भरून गरम करा आणि चोखा. याने अपचनाची समस्या दूर होईल.

– जर स्मरणशक्ती कमकुवत असेल, तर काळीमिरी मधात मिसळून त्याचे सेवन करा.

(टीप : कोणत्याही उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

(Health benefits of Black Pepper)

हेही वाचा :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.