Black Turmeric | आरोग्यासाठी लाभदायी ‘काळी हळद’, यात लपलेत अनेक औषधी गुणधर्म!
काळ्या हळदीमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हे कर्करोगाच्या उपचारात देखील वापरले जातात.
मुंबई : आपल्या आरोग्यासाठी हळद किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. आत्तापर्यंत तुम्हाला केवळ पिवळ्या हळदीबद्दल माहित असे, पण आपल्याला माहित आहे का की काळी हळद देखील उपलब्ध आहे आणि ती आपल्या भारतात देखील आढळते. काळ्या हळदीचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत, ज्याबद्दल आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. या काळ्या हळदीचे फायदे जाणून घेतल्यानंतर आपणसुद्धा ती नियमित वापरण्यास सुरूवात कराल!(Health Benefits of Black Turmeric)
या वनस्पतीची लागवड बंगालमध्ये होते. याचे ताजे गठ्ठे फिक्कट पिवळे असतात. मुख्य गठ्ठ्याचे बाजूचे गठ्ठे आल्यासारखे दिसतात. बाजारांत मिळणारे गठ्ठे काळसर करडे असून त्यांवर गोल कडीं असतात. आंतून करडा काळा रंग, फारच कठीण व शिंगासारखे, याच्या पातळ चकत्या करड्या नारिंगी रंगाच्या किंवा निळ्या रंगाच्या असतात. वास व रुची कापरासारखी असते. बंगालमधे ताजे गठ्ठे हळदीसारखे वापरतात.
काळ्या हळदीमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हे कर्करोगाच्या उपचारात देखील वापरले जातात. काळ्या हळदीच्या रोपाला ‘Curcuma Caesia’ म्हणून ओळखले जाते. ही हळद केवळ स्वयंपाकासाठीच नाही तर औषध म्हणून देखील वापरली जाते. त्यात अँटी-बायोटीक गुणधर्म देखील खूप जास्त आहेत. याव्यतिरिक्त, ही हळद त्वचेवर खाज सुटणे, मुरगळ आणि जखमांसारख्या आजारांना बरे करण्यासाठी वापरली जाते. आपणास हवे असल्यास आपण ते दुधात मिसळून देखील लावू शकता. चला तर मग या काळ्या हळदीविषयी आणि त्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया…
यकृत
ही हळद तुमच्या यकृताला डिटॉक्स करण्याचे काम करते. तसेच आपळे यकृत संबंधित अनेक रोग प्रतिबंधित करते. त्याच्या वापरामुळे अल्सरची समस्या देखील दूर होते.
सूज
काळी हळद देखील शरीराची सूज कमी करण्यासाठी वापरली जाते. कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे मॉलीक्युल अवरोधित करून, सूज कमी करतात (Health Benefits of Black Turmeric).
मासिक पाळी
जर आपल्याला मासिक पाळी अनियमिततेच त्रास होत असेल, तर उपाय म्हणून आपण काही दिवस दुधामध्ये काळी हळद टाकून पिऊ शकता. यामुळे तुमची ही समस्या संपेल.
कर्करोग
चिनी औषधात काळी हळद कर्करोगाचा उपचार करण्यासाठी वापरली जाते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या हळदीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलन कर्करोगाचा धोका देखील कमी होतो.
ऑस्टियोआर्थरायटिस
हा एक आजार आहे जो सांधेदुखी आणि संधिवाताला कारणीभूत आहे, जो आपल्या हाडांच्या सांध्यासंबंधी कूर्चाला नुकसान पोचवतो. त्याच वेळी, हळदमध्ये इबुप्रोफेन असतो, जे सांध्यांचे दुखणे प्रतिबंधित करण्यास प्रभावी आहे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
(Health Benefits of Black Turmeric)
हेही वाचा :
Turmeric | बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, शरीराला ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवले दूर!https://t.co/Lxb4VlMkMk#HealthBenefits #RawTurmeric
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020