Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food | सफरचंद सोलून खाताय? थांबा! आधी या सालीचे फायदे वाचा…

सफरचंद हे एक असे फळ आहे, जे आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेऊ शकते. परंतु, बरेच लोक हे फळ साल सोलून खाणे योग्य समजतात, जे चुकीचे आहे.

Food | सफरचंद सोलून खाताय? थांबा! आधी या सालीचे फायदे वाचा...
वजन कमी करायचे आहे मात्र, दिवसभरात सारखी भूक लागेत मग अशावेळी आपण सफरचंद खाल्ले पाहिजे सफरचंदमुळे देखील वजन कमी होण्यास मदत होते.
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 2:42 PM

मुंबई : सफरचंद हे एक असे फळ आहे, जे आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेऊ शकते. परंतु, बरेच लोक हे फळ साल सोलून खाणे योग्य समजतात, जे चुकीचे आहे. सफरचंदांच्या सालामध्ये पुष्कळ पोषक तत्वे असतात, जी शरीराचे कामकाज सुरळीत करण्यात मदत करतात (Health benefits of eating apple without peeling).

बऱ्याच लोकांना भीती असते की, सफरचंदच्या सालीवर मेण लावलेलं आहे किंवा त्यावर कीटकनाशके वापरली असतील, तर ती आपल्या पोटात जातील. मात्र, सफरचंद साल सोलणे म्हणजे सफरचंदातील सर्वात पौष्टिक भाग काढून टाकणे. साल न सोलता आणि न कापता सफरचंद खाणे केव्हाही चांगले ठरते. सफरचंद सोलून खावे की नाही, याबद्दल जाणून घेऊया…

सफरचंद कसे खावे?

बर्‍याच बाबतीत असे दिसून आले आहे की, सफरचंदावर कीटकनाशके फवारलेली असतात. अशावेळी साल न सोलता सफरचंद खाणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, प्रथम सफरचंद धुवावे आणि नंतर त्यांना एका तासासाठी पाण्यात भिजवत ठेवावे. नंतर त्या सालीवरील कीटकनाशक आणि मेणाचा ठर काढून टाकण्यासाठी त्यांना कोमट पाण्याने 2-3 वेळा धुवावे. हे आपल्याला फळांच्या खऱ्या चवीचा आनंद घेण्यास आणि जास्तीत जास्त फायदे मिळवण्यात मदत करेल.

फायबरयुक्त साल

सफरचंदच्या सालीमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात, ज्यांचे नियमितपणे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याव्यतिरिक्त, विरघळणाऱ्या फायबरमुळे आपले पोट बऱ्याचवेळासाठी भरलेले राहते आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. फायबर आपल्या आतड्यात असणाऱ्या अनुकूल बॅक्टेरियांच्या वाढीसाठीदेखील मदत करते.

जीवनसत्त्व समृद्ध सफरचंदाची साल

तज्ज्ञांच्या मते, सफरचंदाच्या सालीत भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी आणि ए आहे. प्रत्येक सफरचंदच्या सालामध्ये 8.4 मिलीग्राम व्हिटामिन सी आणि 98 आययू व्हिटामिन ए असते. सफरचंद सोलून खाल्ल्यास ही जीवनसत्वं निघून जातात (Health benefits of eating apple without peeling).

कर्करोगावर नियंत्रण

कॉर्नेल विद्यापीठात 2007मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, सफरचंदच्या सालामध्ये ट्रायटरपेनॉइड नावाचे एक कंपाऊंड असते, जे मानवी शरीरात कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी ओळखले जाते. त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट देखील असतात, ज्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

श्वासोच्छवासाच्या समस्या कमी होतात

सफरचंदाच्या सालामध्ये क्वेरेसेटिन नावाचे फ्लॅव्होनॉइड देखील असतो, जे फुफ्फुसांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. जे लोक दर आठवड्यात 5 किंवा अधिक सफरचंद खातात, त्यांचे फुफ्फुस चांगले कार्य करते, हे सिद्ध झाले आहे.

वजन कमी करण्यास प्रभावी

जर, आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सफरचंद सालासमवेत खाण्याचा प्रयत्न करा. या फळाच्या सालीमध्ये ओरसोलिक आम्ल हा एक आवश्यक कंपाऊंड असतो, जो लठ्ठपणाशी लढायला मदत करतो. हे स्नायूची चरबी वाढवते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करते, त्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. आपण अक्खे सफरचंद किंवा ओट्समध्ये वैगरे घालून खाऊ शकता.

पोषका घटकांचा खजिना

इलिनॉयस विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार सफरचंदाच्या सालामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फोलेट, लोह आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात.

(Health benefits of eating apple without peeling)

हेही वाचा :

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.