Garlic Tea | अशाप्रकारे बनवा ‘लसूण चहा’, आरोग्याला होतील अनेक फायदे!

लसूण भारतीय अन्न पदार्थात दररोज मुबलक प्रमाणात वापरला जातो. विशेषतः भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लसूण वापरला जातो.

Garlic Tea | अशाप्रकारे बनवा ‘लसूण चहा’, आरोग्याला होतील अनेक फायदे!
लसूण बहुधा भाज्यांमध्ये वापरला जात असला, तरी आपण कधी लसूण चहा बनवला आहे का?
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 12:41 PM

मुंबई : लसूण भारतीय अन्न पदार्थात दररोज मुबलक प्रमाणात वापरला जातो. विशेषतः भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात लसूण वापरला जातो. लसूण अन्न पदार्थाची चव वाढवते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. ही बहुगुणी लसून लोक अनेक प्रकारे सेवन करतात. शिवाय लसूण वृद्धांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे (Health Benefits of Garlic Tea).

आयुर्वेदात लसणाचे बरेच फायदे सांगितले आहेत. लसूण बहुधा भाज्यांमध्ये वापरला जात असला, तरी आपण कधी लसूण चहा बनवला आहे का? हो… हा लसूण चहा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लसूण चहा बनवण्याची पद्धत काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते आज आपण जाणून घेऊया…

लसूण चहा कसा बनवायचा?

लसूण चहा बनवण्यासाठी प्रथम काही लसूण पाकळ्या सोलून घ्या. एका भांड्यात 3 कप पाणी घ्या आणि त्याला उकळी येऊ द्या. आता या पाण्यात लसूण चिरून घाला आणि काही मिनिटे उकळवा. आता ते गॅसवरून बाजूला काढा आणि त्यात मध व लिंबाचे काही थेंब घाला. झाला आपला लसूण चहा तयार!!

या चहाचे फायदे

– रिकाम्या पोटी लसूण चहा पिण्यामुळे तुमची चयापचय वाढते. याशिवाय हे पचनसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

– लसूण चहा प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

– लसूण चहा कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. हे कोलेस्टेरॉलची पातळी निरोगी राखण्यास देखील उपयुक्त आहे.

– हा चहा शरीरात रक्तातील साखरेची पातळी समतोल राखण्यास मदत करतो.

(Health Benefits of Garlic Tea)

लसूण सेवन करण्याचे आणखी काही फायदे :

आरोग्याच्या बाबतीत लसूणचे बरेच फायदे आहेत. लसूणच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच सर्दी, सौम्य खोकला, गॅस, आम्लपित्त, सांधेदुखीसारख्या सर्व त्रासांतून आराम मिळतो. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. आरोग्य सुदृढ ठेवण्याबरोबरच लसूण आपल्या त्वचेच्या बर्‍याच समस्यांपासून आराम देऊ शकते.

लसणीच्या अति सेवनाने उद्भवणाऱ्या समस्या :

– जर आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु रक्तदाब कमी असल्यास लसूणचे सेवन केल्याने आपली समस्या वाढू शकते. वास्तविक, लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी उत्तम कार्य करतो, अशा परिस्थितीत जर कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी लसूण खाल्ले, तर त्यांच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

– हिमोग्लोबिनचा अभाव म्हणजे शरीरात लाल रक्तपेशींचा अभाव. ज्यास सामान्य भाषेत अशक्तपणा म्हणतात. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, आपण जास्त प्रमाणात लसणाचे सेवन करणे टाळावे.

– लसणीमध्ये एलीनेज नावाचे एंजाइम असते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ देखील उठू शकते. यात असलेले एंजाइम द्रव्य यामुळे लसूण कापताना हातांमध्ये जळजळ जाणवते. जर तुम्हाला आधीच पुरळ उठण्याची समस्या असेल तर, लसूण मर्यादित प्रमाणात खा, नाही तर ही समस्या वाढू शकते.

(टीप : डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of Garlic Tea)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.