हिवाळ्यातील आजारांपासून करेल तुमचे संरक्षण, जाणून घ्या ‘पेरूच्या पानां’चे अनोखे फायदे!
पेरूच्या पानांमध्ये पुष्कळ औषधी घटक आढळतात जे हिवाळ्यातील सर्व आजारांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करतात.
मुंबई : बहुतेक लोकांना पेरु या फळाच्या सर्व फायद्यांविषयी माहिती आहे. परंतु, तुम्हाला त्याच्या पानांच्या फायद्यांबद्दल माहिती आहे का? हो, पेरूच्या पानांमध्ये पुष्कळ औषधी घटक आढळतात जे हिवाळ्यातील सर्व आजारांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करतात. तसेच, पोटातील इतर समस्या, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करतात. आपण पेरूच्या पानांचा रस पिऊ शकतो, अथवा पेरूची पाने कच्ची चावून देखील खाऊ शकतो (Health Benefits of Guava Leaves juice during winter).
गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम.
ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरू पाने खावीत. पेरूच्या पानातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पोटातील घाण बाहेर काढतात आणि पोटाला आतून थंडावा देतात. याशिवाय ही पाने रक्त शुद्ध करण्याचे कामही करतात. पेरूच्या पानांचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार बनते आणि मुरुमं, पुळ्या इत्यादी समस्या कमी होतात.
कोलेस्टेरॉल कमी करते.
दररोज पेरूची पाने खाल्याने कोलेस्टेरॉल देखील कमी होतो. शरीरात रक्त परिसंचरण चांगले राहते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो.
सर्दी, खोकला आणि घशाच्या समस्येपासून मुक्तता
हंगामी सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे अशा समस्या निर्माण होत असतील, तर पेरुच्या पानांचा रस दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावा. याने बराच आराम मिळतो. सतत खोकला असल्यास काही दिवस नियमित पेरूच्या पानांचा रस सेवन केल्याने देखील खोकल्याची समस्या दूर होते (Health Benefits of Guava Leaves juice during winter).
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उत्तम काढा
जर पेरुच्या पानांचा काढा डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पिण्यास दिला तर, त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित होते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे सर्व त्रास दूर होतात.
केसांचा बळकट करतो.
जर आपले केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर पेरूचा रस केसांच्या मुळांवर लावावा. याने केस गळणे काही दिवसांतच थांबेल. तसेच केस चमकदार आणि जाडही होतील.
असा बनवा काढा
एका भांड्यात दीड कप पाणी घ्या. पेरूची थोडी ताजी पाने तोडून त्यात घाला आणि हे पाणी अर्धे होईपर्यंत मंद आचेवर उकळा. त्यानंतर थोडीशी मिरपूड घाला आणि चवीसाठी एक चमचा मध मिसळा आणि चहा प्रमाणे गाळून हा काढा प्या.
(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
(Health Benefits of Guava Leaves juice during winter)
हेही वाचा :
Hair Mask | केस गळती, रुक्षपणा समस्या होणार दूर, ‘हा’ हेअर मास्क ठरेल केसांसाठी वरदान!https://t.co/eedFAgnEcM#HairCare #HairMask
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020