Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!

प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते.

Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!
दूध
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 4:49 PM

मुंबई : दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. जर दुधाला थंड पिण्याऐवजी, गरम करू सेवन केले गेले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात (Health benefits of hot milk).

गरम दूध कधीही सेवन केले जाऊ शकते. त्यामध्ये स्वाद वाढवण्यासाठी आपण त्यात काही मसाले देखील वापरू शकतो. प्रत्येक कप गरम दुधात सुमारे 12 ग्रॅम नैसर्गिक साखर असते, जी आपले स्नायू आणि मेंदू मजबूत करते. त्यात 8 ग्रॅम पूर्ण प्रथिने देखील आहेत, ज्यात सर्व अमीनो आम्ल असतात. हे आपल्या स्नायूंना सामर्थ्य आणि मजबुती देतात. एवढेच नाही तर गरम दूध प्यायल्याने शरीराची उर्जाही वाढते. चला तर, मग जाणून घेऊया गरम दूध पिण्याच्या आणखी काही फायद्यांविषयी…

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते

रात्री झोपायच्या आधी एक कप कोमट दूध प्यावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यास मदत करेल, प्रामुख्याने टाईप-1 मधुमेह असणाऱ्यांनी दुधाचे सेवन करावे. ज्यांना रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार आहे, त्यांनी देखील गरम दुधाचे केलेच पाहिजे.

शांत झोप लागते

गरम दूध आपले मन आणि शरीर आरामदायी ठेवण्यास मदत करते. झोपायच्या आधी एक ग्लास गरम दुधाचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता वाढण्यास आणि सुधारण्यास मदत होते. हे यातील ट्रिप्टोफेन नावाच्या घटकाच्या उपस्थितीमुळे होते.

वजन कमी करण्यात मदत करते

विशेषत: झोपेच्या वेळी एक ग्लास उबदार दूध पिण्याने, पोट बराच वेळ भरलेले राहते. हे आपल्याला रात्री उशिरा लागणारी भूक टाळण्यास मदत करू शकते, जे वजन वाढवण्यासाठी मदत करते (Health benefits of hot milk).

स्त्रियांची हाडे मजबूत होतील

कोमट दूध पिण्यामुळे दुधातील पोषण वाढते. हीटिंग प्रक्रिया दुधात उपस्थित एन्झाईम्स सक्रिय करते आणि ते शरीर चांगले शोषून घेतात, ज्यामुळे हाडांची घनता सुधारते. कोमट दूध पिण्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. जसे की, ऑस्टिओपेनिया, ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चर.

दात मजबूत होतात

जर तुम्हाला दात किडणे आणि दात दुखीमुळे त्रास होत असेल, तर दररोज गरम दूध पिणे खरोखर मदत करेल. यामुळे आपले दात बळकट होतील, ज्यामुळे दात किडण्याचा धोका कमी होईल. दुधामध्ये बायोएक्टिव्ह घटक असतात, जे सूक्ष्मजीव वाढण्यास प्रतिबंध करतात.

गरम दूध आणखी चवदार कसे बनवाल?

जेव्हा, आपण ते काही विशेष मसाल्यांसह सेवन करता, तेव्हा त्याचा प्रभाव आणखी वाढतो. आपले पचन निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, 2 चिमूटभर हळद घातलेले कोमट दूध प्या. दालचिनी आणि आल्याप्रमाणे हळदीमध्ये फायदेशीर अँटिऑक्सिडेंट्स असतात. हे शरीरातील दाह कमी करण्यास देखील मदत करतात.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of hot milk)

हेही वाचा :

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.