Health Tips | मधुमेहावर गुणकारी जांभळाच्या बिया, वाचा याचे असेच अनेक फायदे…

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Health Tips | मधुमेहावर गुणकारी जांभळाच्या बिया, वाचा याचे असेच अनेक फायदे...
या लोकांनी चुकूनही खाऊ नका जांभूळ, आरोग्याला ठरु शकते हानिकारक
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 5:17 PM

मुंबई : जांभळाचे आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जांभळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी करण्यात येतो. जांभूळ आहे हे फळ मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, याकृत रोग आणि रक्तजन्य विकारात अतिशय लाभदायक आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाच्या बिया या चूर्णाच्या स्वरूपात देणे सर्वोत्तम उपाय मानला जातो (Health Benefits Of Jaamun Seed aka Java pulm).

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. चला तर, जांभूळ खाऊन बिया फेकून देण्यापूर्वी त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया…

मधुमेहावर नियंत्रण :

जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. त्यात असलेल्या अल्कोलीड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास आळा बसतो आणि म्हणूनच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राखले जाते. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा आणि दिवसातून तीनदा खा. मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील. हा उपाय पारंपरिक असून अतिशय परिणामकारक आहे. त्यामुळे मधुमेहाचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.

रक्तदाबाचा त्रास कमी होण्यास :

मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब 34.6% नी कमी होतो. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्समध्ये रक्तदाब विरोधी गुणधर्म असतात.

शरीर डिटॉक्स करते :

जांभळात फ्लावोनाईड्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यास मदत करतात. त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट इंझाएम सुरक्षित ठेवतात. यामुळे जांभूळ डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते आणि इम्यून सिस्टिमचे कार्य सुरळीत करते (Health Benefits Of Jaamun Seed aka Java pulm).

पोटांच्या विकारांवर उपयुक्त :

पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरतं. बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर  आणि गॅस्ट्रो इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर आहे. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून 2-3 वेळा घ्या.

मुरुमांवर लाभदायी :

जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावरती लेप केल्याने चेहऱ्यावरती आलेल्या तारुण्यटिपिका म्हणजेच मुरुमे बरे होण्यास मदत होते. मुलतानी माती, चंदन पावडर व जांभूळ पावडर यांचे एकत्रित मिश्रण करून याचा लेप चेहऱ्यावरती नियमित लावल्यास मुरमे नाहीसे होतात व चेहरा उजळतो, काळपटपणा दूर होतो म्हणून सौंदर्यप्रसाधनांच्या दृष्टीनेसुद्धा जांभळाचे महत्त्व आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits Of Jaamun Seed aka Java pulm)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.