Kinnu Benefits | हिवाळ्यात ‘किन्नू’ खाण्याचे अनेक फायदे, बऱ्याच रोगांपासून होईल शरीराचे संरक्षण!

हिवाळ्याच्या दिवसांत रंगाने पिवळे तांबडे, दिसायला आकर्षक, चवीला आंबट गोड असणाऱ्या किन्नू संत्र्यांची मार्केट यार्डात आवक सुरू होते.

Kinnu Benefits | हिवाळ्यात 'किन्नू' खाण्याचे अनेक फायदे, बऱ्याच रोगांपासून होईल शरीराचे संरक्षण!
किन्नू हे मोसंबी आणि संत्र्याचे संकरित लिंबूवर्गीय फळ आहे.
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 1:05 PM

मुंबई : हिवाळ्याच्या दिवसांत रंगाने पिवळे तांबडे, दिसायला आकर्षक, चवीला आंबट गोड असणाऱ्या किन्नू संत्र्यांची मार्केट यार्डात आवक सुरू होते. किन्नू हे मोसंबी आणि संत्र्याचे संकरित लिंबूवर्गीय फळ आहे. पंजाब आणि राजस्थान राज्यात मोसंबी आणि संत्र्याचा संकर असलेल्या किन्नू या लिंबूवर्गीय फळाचे उत्पादन घेतले जाते. डिसेंबर महिन्यात किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू होतो. तो साधारणपणे मार्चपर्यंत सुरू असतो (Health Benefits of kinnu fruit).

आहार तज्ज्ञांच्या मते, आपल्या आहारात किन्नूचा समावेश केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. चला तर जाणून घेऊया या फळाच्या फायद्यांविषयी…

किन्नूमुळे पचन सुधारते.

किन्नू बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे फळ आपल्या पोटात सहज विरघळते आणि आपल्या पचनसंस्थेवर कोणताही दबाव न टाकता आपल्या पाचक प्रणालीस मदत करते. तर, जर आपले पोट अशक्त असेल किंवा अपचनाची तक्रार असेल तर आपण न्याहारीमध्ये किन्नूचा रस घेणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञ प्रभावी परिणामांसाठी दिवसातून दोनदा ताजे फळ खाण्याची शिफारस करतात.

अॅलर्जी आणि छातीत जळजळ कमी करते.

जर, आपण छातीत जळजळ किंवा अॅसिडीटमुळे त्रस्त असाल, तर किन्नूचे सेवन करणे अतिशय फायदेकारक ठरते. किन्नू या फळामध्ये खनिज लवण असतात, ज्यामुळे शरीरातील आम्लता कमी होते. जे लोक दिवसभर बसून अधिक काम करतात त्यांच्यासाठी किन्नुचे दररोज नियमितपणे सेवन करणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

व्हिटामिन सी आणि खनिज समृद्ध

किन्नू हे फळ व्हिटामिन सी समृद्ध आहे, जे अँटी-एजिंगसारखे कार्य करते. किन्नू खाणे किंवा त्याचा रस पिणे देखील सुरकुत्यांच्या समस्यांवर फायदेशीर ठरते. याशिवाय किन्नूमध्ये असलेले खनिजे आपल्या सर्वांगीण चयापचयच नव्हे, तर त्वचा देखील चमकदार बनवतात (Health Benefits of kinnu fruit).

नैसर्गिक ऊर्जा देते.

आपण नियमितपणे किन्नू खाल्ल्यास ते आपल्या शरीरास नेहमीच सक्रिय ठेवते. ग्लूकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज कार्बोहायड्रेट हे घटक किन्नूमध्ये आढळतात. या फळाला उर्जेचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. आपण किन्नू कोणत्याही स्वरूपात घेऊ शकता. मग, तो रस असो की संपूर्ण फळ. व्यायाम केल्यावरही आपण त्याचा रस पिऊ शकता.

कोलेस्टेरॉलच्या पातळीस संतुलित करते.

लिंबूवर्गीय किन्नू शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची उपस्थिती आणि परिणाम कमी करण्यास आणि आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची मात्रा वाढवण्यासाठी लाभदायी असल्याचे, आरोग्य तज्ज्ञ सांगतात. जर किन्नूचा वापर दररोज केला गेला तर त्यातील एथेरोस्क्लेरोसिसमुळे, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

(टीप : कोणत्याही फळाचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of kinnu fruit)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....