मुंबई : पुदीना ही एक अशी वनस्पती आहे, जी सामान्यतः स्वयंपाकघरात चटणी बनवण्यासाठी म्हणून वापरली जाते. पुदीन्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ही पाने आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी आहे. यासह, हे पोटात होणार्या बर्याच समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. परंतु, पुदीना वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आज आपण पुदीनाच्या पानांच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. तसे, आपण याचा योग्य वापर कसा करू शकतो, हे देखील जाणून घेऊया…(Health benefits of mint aka pudina)
पुदीन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटामिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे आणि लोह आढळतात. या पानांच्या सेवनाने उलट्या रोखता येतात आणि पोटातील गॅस देखील काढून टाकता येतो. तसेच, साठलेल्या कफावर देखील पुदिना उपयुक्त आहे. कारण, पुदीना गरम प्रभावाचा आहे, ज्यामुळे तो शरीरातून घाम काढून ताप काढून टाकतो. आपल्याला एखादा किडा चावल्यास, त्याचे विष काढून करण्याचे गुणधर्म देखील पुदीन्यामध्ये आहेत.
सहसा आपण चटणीचा स्वाद वाढवण्यासाठी पुदीना वापरतो. पुदीना चटणी देखील शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. पुदीन्यामध्ये डाळिंब, हिरव्या कच्चे टोमॅटो, लिंबू, आले, हिरवी मिरची, ओवा, काळे मीठ, मिरपूड घालून चटणी बनवली जाते. या चटणीचे सेवन केल्याने पोटा संबंधित आजारांमध्ये फायदा होतो.
पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीना सर्वोत्तम मानला जातो. आजकाल खाण्यापिण्यामुळे पोटात बऱ्याच समस्या उद्भवतात. यासाठी एक चमचा पुदीना रसामध्ये, एक कप कोमट पाणी आणि एक चमचा मध मिसळा. याच्या सेवनाने पोटातील आजारांपासून आराम मिळतो (Health benefits of mint aka pudina).
मसालेदार अन्न खाल्ल्याने बर्याचदा अपचन आणि पोटदुखी होते. अशा अवस्थेत पुदीना उकळवून त्यात मध घालून प्यायल्यास पोटाचा त्रास कमी होतो.
उलट्यांची समस्या टाळण्यासाठी पुदीना वापरणे खूप फायदेशीर मानले गेले आहे. यासाठी पुदीनाच्या पानात दोन थेंब मध मिसळून सेवन करावेत.
पुदीनाच्या पानांची पेस्ट तयार करा आणि त्याला हलके गरम करून, ती कोणत्याही प्रकारच्या जखमेवर किंवा कीटकांच्या चाव्यावर लावा. यामुळे जखम आणि कीटकांच्या चाव्यापासून आराम मिळतो. यासह, यामुळे होणारी वेदना आणि सूज देखील कमी होते.
पुदीन्याचा रस, मिरपूड आणि काळे मीठ मिसळून ते उकळून चहा सारखे प्या. हे सेवन केल्याने सर्दी, पडसे, खोकला आणि तापात आराम मिळतो.
ताज्या पुदीन्याच्या पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळतो.
पुदीना पाने सुकवून बनवलेल्या पावडरचा वापर तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत बनवण्यासाठी करतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Health benefits of mint aka pudina)
Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी
Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!#HairFall | #diabetes | #Health | #HealthCarehttps://t.co/GBfureUNxN
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 27, 2021