Study | ‘Oolong Tea’च्या सेवनाने वजन होईल कमी, वाचा याचे आणखी आरोग्यदायी फायदे…
जगभरात असे लोक क्वचितच आढळतील, ज्यांना चहा पिणे आवडत नाही. चहा पिणे प्रत्येकालाच आवडते. भारतातच नाही तर, जगभरात दिवसाची सुरुवात एका कप चहाने होते.
मुंबई : जगभरात असे लोक क्वचितच आढळतील, ज्यांना चहा पिणे आवडत नाही. चहा पिणे प्रत्येकालाच आवडते. भारतातच नाही तर, जगभरात दिवसाची सुरुवात एका कप चहाने होते. अनेक लोक दिवसभर चहाचे बरेच कप रिचवतात. भारतातही प्रत्येक भागात आणि अगदी प्रत्येक नाक्यावर, चहा विक्रेते आणि चहाचे शौकीन दोघेही सहज दिसून येतात. बर्याच लोकांना बेडवरुण उठल्या उठल्या चहा पिण्याची अर्थात बेड टीची सवय देखील असते. अशा लोकांना सकाळी उठल्याबरोबर अंथरुणावरच चहा हवा असतो (Health Benefits Of Oolong Tea).
त्याच वेळी, बर्याच लोकांना चहाची इतकी सवय असते की, ते दिवसभरात किमान पाच ते दहा कप चहा पितात. परंतु आपणास माहित आहे का की, पुन्हा पुन्हा चहा पिण्याची ही सवय आपले शरीर आतून निकामी करू शकते. अति प्रमाणात चहा पिण्याचे बरेच तोटे यापूर्वीच समोर आले आहेत. परंतु, असे बरेच चहा देखील आहेत, ज्याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला कोणतेही नुकसान होणार नाही. या उलट जर आपण त्यांचे सेवन केले, तर आपल्या शरीराची चरबी कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर ठरेल.
आज आम्ही तुम्हाला सांगणार अशाच एका चहाच्या प्रकाराबद्दल सांगणार आहोत की, जो प्यायल्याने तुमचे वजन देखील कमी होईल. चला तर जाणून घेऊया या चहाबद्दल तपशीलवार माहिती…(Health Benefits Of Oolong Tea)
वजन कमी करणारा ओलाँग चहा!
– ओलाँग चहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा चहा झोपेच्या वेळी देखील आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करतो आणि हा आपला नाही तर जपानच्या विद्यापीठाचा दावा आहे. त्सुकुबा विद्यापीठाने (University Of Tsukuba ) आपल्या संशोधनात हा दावा केला आहे.
– या चहामध्ये कमी प्रमाणात कॅफिन आढळते आणि यामुळे आपल्या चयापचयात सुधारणा होते.
– या चहामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच हे आपल्या चरबी बर्न करण्यात उपयुक्त सिद्ध झाले आहे.
ओलाँग चहाप्रमाणे, गुळाच्या चहाचेही बरेच फायदे आहेत :
– साखरेच्या तुलनेत यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
– गुळाचा चहा घेतल्यास मायग्रेनमध्येही आराम मिळतो.
– गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर मग गुळाचा चहा तुमची ही समस्या दूर करेल.
(Health Benefits Of Oolong Tea)
हेही वाचा :
Lemon Tea | कडाक्याच्या थंडीत हंगामी आजारांपासून बचाव करेल ‘लेमन टी’, वाचा याचे फायदे…#LemonTea | #lemon | #Health | #goodfood https://t.co/ErCqelvmhn
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021