Orange Tea | त्वचेच्या कर्करोगासह अनेक आजारांना दूर ठेवेल ‘संत्र्याच्या साली’चा चहा, वाचा याचे फायदे…

जर आपल्याला चहा पिऊन स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल, तर आपण आपल्या नियमित दुधाच्या चहाऐवजी संत्र्याच्या सालीचा चहा पिऊ शकता.

Orange Tea | त्वचेच्या कर्करोगासह अनेक आजारांना दूर ठेवेल ‘संत्र्याच्या साली’चा चहा, वाचा याचे फायदे...
संत्र्याच्या सालीचा चहा
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 1:48 PM

मुंबई : आपण सर्वजण आपल्या दिवसाची सुरुवात चहापासून करतो. सकाळचा चहा पिण्यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताकद येते. चहामध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. या कारणास्तव, बहुतेक लोक आपला दिवस चहाने सुरू करतात. बऱ्याच घरात दुधाचा चहा बनवला जातो. परंतु, आपण इच्छित असल्यास आपल्याला आवडत असल्यास, विविध प्रकारचे चहा बनवू शकता (Health benefits of Orange peel tea).

जर आपल्याला चहा पिऊन स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल, तर आपण आपल्या नियमित दुधाच्या चहाऐवजी संत्र्याच्या सालीचा चहा पिऊ शकता. हिवाळ्यात संत्र हे फळ शोधणे फार सोपे आहे. त्यात व्हिटामिन सीचे समृद्ध गुणधर्म आहेत. पण संत्र्याच्या सालीमध्येही अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. संत्र्याची साल तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कार्य करते.

संत्र्याच्या सालीचा चहा कसा बनवाल?

साहित्य :

संत्र्याची साल

अर्धा इंच दालचिनीचा तुकडा

2 ते 3 लवंगा

1 ते 2 वेलची

अर्धा चमचा गुळ

कृती :

एका भांड्यात थोडेसे पाणी घेऊन मंद आचेवर उकळी येऊ द्या. त्यात संत्र्याचे साल आणि सर्व मसाले घाला व थोडावेळ उकळू द्या. चहा गाळल्यानंतर त्यात अर्धा चमचा गुळ घाला.

(Health benefits of Orange peel tea)

संत्राच्या सालाचे फायदे :

लिंबूवर्गीय फळांचा वरचा भाग अर्थात साल चवीला आंबट असते, कारण त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात जे फळांना कीटकांपासून सुरक्षित ठेवतात. संत्र्याप्रमाणेच, त्याच्या सालामध्येही बरेच औषधी गुणधर्म असतात. त्यात फायबर, व्हिटामिन सी आणि पॉलिफेनॉल हे घटक असतात. या व्यतिरिक्त यात प्रो-प्रोटीन, फोलेट थायमिन, व्हिटामिन बी 6 आणि कॅल्शियमचे प्रमाण देखील अधिक असते.

संत्र्याचे साल आरोग्यासाठी फायदेशीर

संत्र्याच्या सालीमध्ये लिमोनिन असते. हे विशेषतः संत्र्याच्या सालामध्येच आढळते. यात कर्करोग आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत. रोज संत्र्याच्या सालाचे सेवन केल्यास जळजळ आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका टाळता येतो.

पाचन तंत्र सुधारते आणि इम्यूनिटी वाढते

दररोज सकाळी हा चहा प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. त्यामध्ये उपस्थित व्हिटामिन सी हा घटक चयापचय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. संत्र्याच्या सालीमध्ये पॉलिफेनोल्स भरपूर प्रमाणात असतात जे टाईप-2 मधुमेह, लठ्ठपणा आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of Orange peel tea)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.