Papaya | केवळ पपईच नव्हे तर, पपईच्या बियादेखील आरोग्यवर्धक, जाणून घ्या याचे फायदे…

पपई खाताना तुम्ही ज्या बिया कचरा म्हणून टाकत होतात, त्या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चला तर, जाणून घेऊया पपईच्या बियांचे फायदे..

Papaya | केवळ पपईच नव्हे तर, पपईच्या बियादेखील आरोग्यवर्धक, जाणून घ्या याचे फायदे...
उन्हाळ्यात पपई खाल्ल्याने मिळतात हे फायदे
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 3:41 PM

मुंबई : पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, हे सर्वांना ठावूक आहे. पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. बरेच लोक आपल्या आहारात नियमितपणे पपईचा समावेश करतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, फक्त पपईच नाही तर त्याच्या बिया देखील शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पपई खाताना तुम्ही ज्या बिया कचरा म्हणून टाकत होतात, त्या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. चला तर, जाणून घेऊया पपईच्या बियांचे फायदे. ज्याचा वापर करून तुम्हालाही तुमच्या काही समस्या सोडवता येतील (Health Benefits Of Papaya Seeds).

बर्‍याच संशोधनातून असे दिसून आले आहे की, पपईबरोबरच पपईच्या बियांमध्येही असे अनेक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पपई प्रमाणेच पपईच्या बिया पोटासाठी खूप फायदेशीर असतात. आपल्याला पचनासंबंधित समस्या असल्यास, या बियांद्वारे आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकता. पपईच्या  बिया आपल्या शरीरात उपस्थित बॅक्टेरिया आणि बरेच हानिकारक जंतू आतड्यांमधून काढून टाकतात.

पपईच्या बियांचे फायदे :

– स्त्रियांच्या मासिक पाळी दरम्यान पपईच्या बिया औषध म्हणून कार्य करते. या बिया केवळ अधून मधून येणाऱ्या वेदनांपासून मुक्त देत नाहीत, तर इतर पोटदुखी वगैरेची तक्रार असल्यास पपईच्या बिया हा त्रास दूर करण्यात फायदेशीर ठरतात. यामुळे स्नायूंना खूप आराम मिळतो आणि वेदनांपासून मुक्तता मिळते.

– पपईच्या बिया अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध असतात, म्हणून त्या शरीरातील रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. याच बरोबर आपल्या शरीराला सामान्य सर्दी, सौम्य खोकला, सर्दी या आजारांपासून दूर ठेवतात. यात जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे आपली पाचक तंत्र आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर या बिया तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

– ब्लड प्रेशरची तक्रार असणार्‍या लोकांसाठी पपईच्या बिया फायदेशीर ठरतात. यामुळे तुमचे हृदयही चांगले राहते. तसेच, आपले शरीर भविष्यात उद्भवणाऱ्या रोगांपासून देखील सुरक्षित राहते (Health Benefits Of Papaya Seeds).

पपईच्या बियांचे सेवन कसे करावे?

पपईच्या बिया खाण्यापूर्वी त्या कशा खाव्यात आणि त्यांचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे, हे माहित असणे आवश्यक आहे. पपईच्या बियांचे सेवन करण्यापूर्वी आपण आपल्या आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांशी बोलले पाहिजे. ते सांगतील त्याप्रमाणेच पुढील कृती करावी. तथापि, पपईच्या बिया सामान्यत: वाटून, किंवा रस करून सेवन करतात येतात. पपईच्या बिया थेट चावून खाणे टाळावे. याशिवाय तुम्ही पपईच्या बियांसोबत मध किंवा गुळ देखील खाऊ शकता.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

(Health Benefits Of Papaya Seeds)

हेही वाचा :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.