Health Tips | कर्करोगासारख्या गंभीर आजारांनाही दूर ठेवेल गुणकारी ‘भोपळ्याची बी’, जाणून घ्या याचे फायदे…

भोपळ्याच्या बियांना पॅपिटस देखील म्हटले जाते. यात मॅग्नेशियम, लोह आणि फायबर हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

Health Tips | कर्करोगासारख्या गंभीर आजारांनाही दूर ठेवेल गुणकारी ‘भोपळ्याची बी’, जाणून घ्या याचे फायदे...
भोपळ्याच्या बियांचे आरोग्यवर्धक फायदे
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 4:28 PM

मुंबई : बर्‍याच लोकांना भोपळ्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही. काही लोक भोपळ्याच्या बिया देखील फेकून देतात. परंतु, भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत, याविषयी कदाचित काही लोकानांच माहित असेल. भोपळ्याच्या बियांना पॅपिटस देखील म्हटले जाते. यात मॅग्नेशियम, लोह आणि फायबर हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात (Health benefits of pumpkin seeds).

या भोपळ्याच्या बिया आपण आपल्या सकाळच्या न्याहारीमध्ये ‘हेल्दी स्नॅक’ म्हणून खाऊ शकता. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, दररोज भोपळ्याच्या 30 ग्रॅम बिया सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर, भोपळ्याच्या बियांचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेऊया…

हृदयासाठी फायदेशीर

भोपळ्याच्या बियांमध्ये निरोगी फॅट, फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट घटक असतात. जे आपल्या हृदयासाठी अतिशय चांगले असतात. त्यातील फॅट शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम करते. तर, त्यातील मॅग्नेशियम घटक आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

अँटी-इंफ्लेमेटरी

भोपळ्याच्या बियामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे संधिवाताच्या वेदना कमी होण्यास मदत होते. या बिया सांधेदुखीच्या उपचारात घरगुती आणि सोपा उपाय म्हणून वापरल्या जातात.

प्रतिकारशक्ती वाढवतात

अँटिऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्सची चांगली मात्रा असणाऱ्या भोपळ्याच्या बिया आपण आजारी पडल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच, हंगामी संक्रमणापासून आपले संरक्षण करण्यासाठी देखील अतिशय उपयोगी ठरतात.

प्रोटेस्ट कर्करोगाचा धोका कमी होतो

एका अभ्यासानुसार, झिंक हा घटक पुरुषांच्या प्रजनन क्षमतेस चालना देण्यात आणि प्रोस्टेटशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करतो. भोपळ्याच्या बियांमध्ये डीएचईए (Di-Hydro epi-androstenedione) असते ज्यामुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो. टीओआयच्या अहवालानुसार भोपळ्याचे बिया सेवन केल्यास फुफ्फुस, कोलन, स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका देखील कमी होतो (Health benefits of pumpkin seeds).

मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर

या बिया ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करतात. बियांमध्ये सकारात्मक प्रथिने असतात, ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

केसांसाठी फायदेशीर

भोपळ्याच्या बियामध्ये कुकुरबीटासिन हा एक अद्वितीय अमीनो आम्ल असतो, जो केसांच्या वाढीस मदत करतो. याशिवाय त्यात व्हिटामिन सी देखील भरपूर प्रमाणात आहे, जे केसांच्या वाढीमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आपण स्काल्पवर भोपळ्याच्या बियाचे तेल लावू शकता. तसेच आपण दररोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाऊ शकता.

अशाप्रकारे करा सेवन :

– भोपळ्याचे बी उन्हात वाळवून ते भाजून देखील खाऊ शकता.

– बिया बारीक वाटून सलाड किंवा आमटीमध्ये मिसळा.

– कप केक्स भोपळ्याच्या बियांनी सजवू शकता.

– आपल्या स्मूदीत भोपळ्याचे बियाणे टाकू शकता.

– होममेड सॉस तयार करताना त्यात भोपळ्याच्या बिया टाका.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(Health benefits of pumpkin seeds)

हेही वाचा :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.