Health Tips | सकाळी डोळे उघडताच तुम्हीही करताय ‘या’ चुका? आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक!

आपल्या खराब जीवनशैलीमुळे, आपण दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे करू शकत नाही. नकळत आपण बऱ्याच चुकीच्या सवयी पाळत आहोत. ज्या आपल्यासाठी हानिकारक आहेत.

Health Tips | सकाळी डोळे उघडताच तुम्हीही करताय ‘या’ चुका? आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक!
सवयी
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 2:19 PM

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकालाच आपला रोजचा दिवस उत्साही आणि सकारात्मक मूडसह प्रारंभ करायचा असतो. परंतु, आपल्या खराब जीवनशैलीमुळे, आपण दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे करू शकत नाही. नकळत आपण बऱ्याच चुकीच्या सवयी पाळत आहोत. ज्या आपल्यासाठी हानिकारक आहेत. या सवयी आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट आणि गंभीर परिणाम करतात. आपण या सवयींबद्दल अज्ञात असतो (Health Tips morning habits for good health).

बहुतेक लोक या सवयींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. या सवयी आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. मात्र, निरोगी जीवनशैलीसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी या सवयी बदलण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे.

लवकर उठल्यावर लगेच काम करणे

बर्‍याच लोकांना अशी सवय असते की, गजर वाजताच अंथरुणातून उठायचं आणि आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करायची. मात्र, हे असे करणे योग्य नाही. झोपेतून उठल्यानंतर हात पायांचा व्यायाम करावा. स्नायूंना आराम द्यावा. यानंतर सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यानंतरच कामांना सुरुवात करावी. असे केल्याने आपल्या शरीरात चपळता आणि वेगवानता येईल. दिवसभर शरीरात ऊर्जा निर्माण होईल.

मोबाईल उघडून पाहणे

आपण सकाळी उठल्याबरोबर आपला मोबाईल तपासला आणि सोशल मीडियावर सक्रिय झालात, तर ही सवय तुमच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्हाला देखील ही सवय असेल, तर लवकरात लवकर बदलण्याचा प्रयत्न करा. दिवसभराची योजना तयार करून, आपल्या दिवसाची सुरुवात करा (Health Tips morning habits for good health).

बेड टीने दिवसाची सुरुवात

सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यायल्याने आम्लपित्त होते. तसेच, आपण बेड टीच्या सवयी ने बर्‍याच रोगांना आमंत्रण देत आहात. तुम्ही चहाऐवजी कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून पिऊ शकता. याशिवाय आपण ग्रीन टी देखील पिऊ शकता. न्याहारी अर्थात नाश्ता खाल्ल्यानंतर तुम्ही चहा आणि कॉफी घेऊ शकता.

स्ट्रेचिंग आवश्यक

रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर, शरीर सक्रिय ठेवण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम करा. स्ट्रेचिंग आपल्यासाठी चांगले आहे. स्ट्रेचिंग आणि हलके-फुलके व्यायाम आपल्याला आजारांपासून वाचवेल.

(Health Tips morning habits for good health)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.