दिवस मावळल्यावर चुकूनही खाऊ नका काही पदार्थ, अन्यथा आरोग्याला धोका!
यापैकी एक गोष्टही आपण आयुष्यात पाळू शकलो तर आरोग्यावर बऱ्याच अंशी सकारात्मक परिणाम होतो. जर आपण फक्त एवढंच ओळखू शकलो की रात्री झोपण्यापूर्वी आणि जेवताना कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये. तरी ते आरोग्यासाठी फायदेशील आहे.
मुंबई : भारतीय आयुर्वेदात (Ayurved) प्रत्येक खाण्यापिण्याची एक वेळ ठरलेली आहे. सूर्यास्ताच्या आधी कोणत्या गोष्टी खाव्यात आणि सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी खाव्यात (Food) हे देखील एक संपूर्ण शास्त्र आहे. दिवसाच्या कोणत्या वेळी काय सेवन करणे चांगले? सूर्यास्तानंतर काय खाऊ नये आणि सूर्योदयानंतर (Sunset) काय खावे. आधुनिक जीवनशैलीत, लोकांना या गोष्टी माहित नाहीत किंवा ते त्यांचे पालन करत नाहीत. आयुर्वेदाचे हे सर्व नियम पूर्णपणे समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे आपल्यासाठी शक्य नाही. पण यापैकी एक गोष्टही आपण आयुष्यात पाळू शकलो तर आरोग्यावर बऱ्याच अंशी सकारात्मक परिणाम होतो. जर आपण फक्त एवढंच ओळखू शकलो की रात्री झोपण्यापूर्वी आणि जेवताना कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये. तरी ते आरोग्यासाठी फायदेशील आहे.
काकडी– काकडी थंड असते. त्यामुळे काकडी-काकडीचे सेवन रात्री करू नये म्हणजे अगदी उन्हाळ्यातही रात्री काकडी टाळा. सूर्यास्तानंतर काकडी खाऊ नये असे आयुर्वेदात सांगितले आहे.
दही – दहीही बरेच थंड असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात आणि रात्री उशिरा दह्याचे सेवन न करणे चांगले.
कॉफी– कॉफीमध्ये असलेले निकोटीन झोपेवर परिणाम करते. याचे कारण म्हणजे ते मेंदूची मज्जासंस्था सक्रिय करते. त्यामुळे संपूर्ण शरीर सक्रिय होऊन झोप येत नाही. त्यामुळे सूर्यास्तानंतर चहा कॉफी आदींचे सेवन करू नये यासाठी प्रयत्न करावेत.
जंक फूड– जंक फूड दिवसाच्या कोणत्याही वेळी खाणे हानिकारक आहे, परंतु जर तुम्ही रात्री उशिरा जंक फूड खात असाल तर ते विशेषतः जास्त हानिकारक आहे कारण त्यामध्ये असलेले प्रोसेस्ड रिफाइंड कार्ब पचायला खूप जड असते.
चिकन – रात्रीच्या जेवणातही चिकनही न खाण्याचा प्रयत्न करा. प्रथिने पचायला जड असल्यामुळे चिकन दुपारच्या जेवणात खाऊ शकतो. रात्री मोठ्या प्रमाणात चिकन खाणे हानिकारक असू शकते कारण ते सहज पचत नाही.
जास्त मसाल्यांचा आहार– ज्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे किंवा ज्यात प्रामुख्याने प्रथिने आहेत, ते रात्रीच्या वेळी टाळावे. याचे कारण म्हणजे प्रथिने पचायला जड असतात आणि रात्री खाल्लेले जड अन्न फॅट होऊन शरीरात जमा होते.
प्रोटीन शेक– बॉडी बिल्डर्स आणि जिममध्ये जाणारे अनेकदा जिमनंतर प्रोटीन शेकचे सेवन करतात. पण जर तुम्ही रात्री जिमला जात असाल तर रात्री प्रोटीन शेक पिऊ नका. सकाळी रक्तातील साखर वाढण्याचा धोका देखील असतो.
हळद, बटाटा आणि दुधापासून ‘असा’ बनवा फेसपॅक, त्वचेच्या सर्व समस्या होतील छूमंतर!
दातांच्या दुखण्याला करा बाय बाय… हे घरगुती उपाय ठरतील परिणामकारक
Turmeric For Skin: अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाका, त्वचेच्या सगळ्या समस्या होतील दूर!