Health Tips | कोरोना काळात घरीच राहून इम्युनिटी वाढवायचीय? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार देशावर फारच मोठा परिणाम करत आहे. विषाणूची ही दुसरी लाट आणखी प्राणघातक ठरत आहे आणि बरेच लोक श्वासोच्छवासाच्या समस्या आणि फुफ्फुसांच्या समस्येबद्दल तक्रारी करत आहेत.

Health Tips | कोरोना काळात घरीच राहून इम्युनिटी वाढवायचीय? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!
ध्यानधारणा
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 7:17 AM

मुंबई : कोरोना विषाणूचा नवीन प्रकार देशावर फारच मोठा परिणाम करत आहे. विषाणूची ही दुसरी लाट आणखी प्राणघातक ठरत आहे आणि बरेच लोक श्वासोच्छवासाच्या समस्या आणि फुफ्फुसांच्या समस्येबद्दल तक्रारी करत आहेत. ताज्या अहवालानुसार, कोरोना झालेल्या बर्‍याच रुग्णांची ऑक्सिजन पातळी 80च्या खाली जात आहे, जे खूप गंभीर आहे (Health Tips to boost immunity level during corona pandemic).

म्हणूनच, या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणे फार महत्वाचे आहे. सध्या अनेक शहरे व राज्यांमध्ये लॉकडाऊन व कर्फ्यू लागू असल्याने कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीय. तसेच, कठीण काळातही शक्य तितक्या सुरक्षित घरातच रहाण्यास सांगितले गेले आहे. म्हणून, आज आपण सगळे घरी आहोत. या काळात काही सोप्या टिप्स लक्षात ठेवून आपणास या साथीच्या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती बळकट करू शकतो, जे अशा वेळी आपल्यासाठी एक वरदान ठरेल.

ध्यानधारणा करून स्वत:ला शांत करा.

सध्या आपण ज्या परिस्थितीला सामोरे जात आहोत, अशा परिस्थितीत तणाव येणे स्वाभाविक आहे. याकाळात अनेक लोक आजाराशी झगडत आहेत आणि काही लोक घरातच अआहेत. या मानसिक ताणापासून मुक्त होण्यासाठी आणि स्वतःला शांत करण्यासाठीचा उत्तम मार्ग म्हणजे ध्यानधारणा करणे. यासाठी आपल्याला फक्त आपल्या घरी एक शांत कोपरा शोधावा लागेल आणि स्वत:ला थोडा वेळ द्यावा लागेल. शांततेत ध्यानधारणा करण्यासाठी दिवसाची किमान 20-30 मिनिटे घ्या. असे केल्याने, केवळ आपला ताण दूर होणार नाही तर, आपली रोगप्रतिकारशक्ती क्षमता देखील वाढेल (Health Tips to boost immunity level during corona pandemic).

पोषक आहारामध्ये ‘या’ घटकांचा समावेश करा.

नेहमी पौष्टिक अन्न खाणे हा आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. म्हणूनच, आपण आपल्या आहारात काय खाता यावर लक्ष ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून, असे म्हटले जाते की आपण व्हिटामिन सी, फायबर, अँटिऑक्सिडेंट्स आणि प्रोबायोटिक्सचे उच्च स्रोत असलेले खाद्यपदार्थ खावेत. ही पोषकद्रव्ये केवळ आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासच मदत करतात असे नाही, तर या काळात आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करतात.

नैसर्गिक घटकांचे सेवन करा.

काळी मिरी, अडुळसा, जिरे, अश्वगंधा अशा नैसर्गिक पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करा. हे घटक पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण आहेत, जे आपले संरक्षण यंत्रणा बळकट करण्यात मदत करतात. तसेच, स्वयंपाकघरातील हे घटक इतर अनेक आरोग्यविषयक फायदे देखील देतात.

पुरेशी झोप घ्या आणि स्वत:ला हायड्रेटेड ठेवा.

चिंता, तणाव यासारख्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचा अभाव हा एक प्रमुख घटक आहे. तसेच, आता आपण जवळपास मे महिन्यात प्रवेश करत आहोत आणि उष्णता वाढण्याची शक्यता आहे.  यासाठी आपले शरीर हायड्रेट ठेवल्याने यातून आराम मिळू शकतो. त्याचा आपल्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. म्हणून, कोरोनाशी लढण्यासाठी आपले शरीर बळकट करण्यासाठी दररोज कमीतकमी 3-4 लिटर पाणी प्या आणि दररोज 7-8 तास झोप घ्या.

(Health Tips to boost immunity level during corona pandemic)

हेही वाचा :

PHOTO | कोरोना आणि उष्णता दोन्हीवर मात करायचीय? मग, आहारात नक्की सामील करा ‘हे’ घटक…

दररोज आहारात घ्या टोमॅटो सूप, होतील अनेक फायदे

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....