Carrot Recipes | हलवा आणि सलाडच नव्हे, तर गाजरापासून बनवता येतील आणखी अनेक पौष्टिक पदार्थ!

गाजर आपले वजन कमी करण्यात आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांसह, आपल्याला अनेक आरोग्यविषयक समस्यांपासून दूर ठेवण्यात देखील प्रभावी आहेत.

Carrot Recipes | हलवा आणि सलाडच नव्हे, तर गाजरापासून बनवता येतील आणखी अनेक पौष्टिक पदार्थ!
गाजर
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 11:33 AM

मुंबई : हिवाळ्याच्या मोसमात बाजारपेठांमध्ये ‘गाजर’ मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. हे आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. बीटा कॅरोटीन, फायबर, व्हिटामिन के 1, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंट्स हे घटक गाजरांमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. गाजर आपले वजन कमी करण्यात आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांसह, आपल्याला अनेक आरोग्यविषयक समस्यांपासून दूर ठेवण्यात देखील प्रभावी आहेत (Healthy and tasty carrot recipes).

प्रत्येक व्यक्तीने आपल्या आहारात गाजरांचा समावेश केलाच पाहिजे. सामान्यत: लोक गाजर सलाड म्हणून खातात, रस पिततात किंवा गाजरचा हलवा बनवतात. पण तुम्ही गाजरापासून आणखीही बरेच पौष्टिक पदार्थ बनवू शकता आणि दररोज नवीन प्रकारे गाजराचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला गाजरांच्या अशाच काही पाककृतींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला आवडतील आणि तुम्ही त्यांचा आहारात नक्की समावेश कराल…

गाजर-आल्याचे सूप

बहुतेक लोकांना संध्याकाळच्या वेळी सूप पिणे आवडते. अशा वेळी, गाजराचे आले घालून केलेले सूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. गाजर-आले सूप बनवणे खूप सोपे आहे. आपल्याला या दोन घटकांनी बनलेळे सूप तुम्हाला नक्की आवडेल. आपण या सूपमध्ये टोमॅटो देखील घालू शकता.

गाजराचा पराठा

गाजराचे पराठे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच, ते खूप चवदार देखील आहेत. यामध्ये तुम्ही गव्हाच्या पीठाच्या लाटीमध्ये गाजराचे सारण भरून पराठे तयार करू शकता. हे पराठे बाहेरून किंचित कुरकुरीत ​​आणि आतून खूप मऊ असतात. आपण वीकेंड म्हणजेच शनिवार व रविवारी हा पराठा ट्राय करू शकता (Healthy and tasty carrot recipes).

गाजर पुलाव

संध्याकाळच्या जेवणासाठी गाजर पुलाव एक चांगली डिश ठरू शकतो. यासाठी आपण गाजर आणि इतर भाज्यांच्या मदतीने पुलाव बनवू शकता. यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार मसाले देखील घालू शकता, जे त्याची चव अधिक उत्कृष्ट बनवण्याचे काम करतील.

बटाटा, गाजर आणि मटार भाजी

जर, तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी सुकी भाजी बनवायची असेल, तर तुम्ही बटाटा, गाजर आणि मटार भाजी ट्राय करू शकता. ही एक पंजाबी शैलीची सुकी भाजी आहे, जी या तीन गोष्टी एकत्र करून बनवली जाते.

गाजर पायसम

आपण जर आज काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असाल, तर गाजर पायसम करून पाहू शकता. हा पदार्थ गाजर, गूळ आणि नारळाच्या दुधाने बनवला जातो. या गाजर पायसम रेसिपीमध्ये गाजर आधी शिजवले जाते आणि नंतर त्याची प्युरी करून पदार्थ तयार केला जातो.

गाजर रायता

लोकांना जेवताना अनेक प्रकारचे रायते खायला आवडतात. पण, गाजराचा रायतादेखील बनवता येतो हे फारच कमी लोकांना ठाऊक असेल. गाजराचा रायता अत्यंत चविष्ट असतो आणि याल हींगाचा तडका दिल्यावर त्याची चव आणखी वाढते.

(Healthy and tasty carrot recipes)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.