तुम्हालाही सतत पोटदुखीचा त्रास जाणवतो? मग या पदार्थांचे सेवन तुमच्यासाठी ठरू शकेल रामबाण उपाय!
निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार आणि चांगली जीवनशैली असणे गरजेचे असते. तुमच्या शरीरात जीवनसत्वांची कमतरता झाल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी नेमकं कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे जाणून घेऊयात.
आजकाल कामाच्या व्यापामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे तुमच्या शरीरात पोषणाची कमतरता भासू शकते. अशा परिस्तिथीमध्ये निरोगी राहाण्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश केल्यास तुमच्या शरीरातील समस्या कमी होण्यास मदत होते. जंक फूडच्या सेवनामुळे तुमची पचनक्रिया बिघडते ज्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जंक फूडचे सेवन टाळावे आणि घरच्या जेवणाचा अस्वाद घ्यावा असे तज्ञं म्हणतात.
तु्म्ही जर जास्त प्रमाणात तेलकट, मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ले तर तुम्हाला, अॅसिडिटी, अपचन, पोटदुखी, जळजळ यांच्यासारख्या समस्या होतात. तुम्हाला अपचनाचा त्रास तुमच्या शरीरातील जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे देखील होतो. शरीरामध्ये जीवनसत्वाची कमतरता भासल्यास तुम्हाला अपचन आणि पोटदुखीच्या समस्या होऊ शकतात.
व्हिटॅमिन ए
तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन ए या जीवनसत्वाची कमतरता भासल्यास शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अंडी, पपई आणि फिश ऑईलचे सेवन करणे गरजेचे असते. याचे सेवन केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि तुमची दृष्टी सुधारते.
व्हिटॅमिन बी
तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे पोटाचे विकार असतील तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी या जीवनसत्वाची कमतरता असू शकते. पोटचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही हिरव्या भाज्या, धान्य आणि फळांचे सेवन करू शकतात. यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य निरोगी राहाते त्यासोबतच तुमच्या पोटामधील चागले बॅक्टिरिया पचनास मदत करतात.
व्हिटॅमिन सी
तुम्हाला जर जास्त प्रमाणात पिंपल्सस, मुरुम आणि डार्क सर्कल्स यांच्या सारख्या समस्या भासल्या तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी ची कमतरता असू शकते. तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास संत्रा, लिंबू, किवी आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करू शकता. व्हिटॅमिन सीमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या समस्या होणार नाहीत.
व्हिटॅमिन डी
तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी या जीवनसत्वची कमतरता झाल्यामुळे तुमचे हाडे ठिसूळ होतात. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी दररोज सकाळी कवळ्या उन्हामध्ये काही वेळ उभं राहा यामुळे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यास मदत होते. आणि असे केल्याामुळे तुमचे हाडे मजबूत होण्यास मदत होते. तुमच्या आहारामध्ये दररोज अनेक पोषक तत्वांचा समावेश केल्यामुळे तुम्हाला निरोगी राहाण्यास मदत मिळेल.
( वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारीत आहे, तरी कोणत्याही उपयांपूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा)