High Blood Pressure | उच्च रक्तदाबाच्या समस्येने हैराण? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक…
सध्या धकाधकीच्या जीवनशैलीत हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे.
मुंबई : सध्या धकाधकीच्या जीवनशैलीत हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. बहुतेक लोक यासाठी औषधे घेतात, परंतु जीवनशैलीत आणि आहारात काही बदल केल्याने देखील या समस्येला नियंत्रित केले जाऊ शकते. यासाठी आपण आपल्या दिवसाची सुरुवात रक्तदाब नियंत्रित करण्याऱ्या नाश्त्याने करा. चला तर, जाणून घेऊया अशा हेल्दी ब्रेकफास्ट्सबद्दल जे उच्चरक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी सर्वोत्तम मानले जातात (Healthy Breakfast for high blood pressure patients).
रक्तदाब नियंत्रणात ठेवणारा हेल्दी नाश्ता
ओट्स
दिवसाचा प्रारंभ करण्यासाठी ओट्सपेक्षा जास्त हेल्दी दुसरे काहीच असू शकत नाही. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, जे रक्तदाबाच्या समस्येवर खूप चांगले असतात. उच्च रक्तदाब असलेल्यांनी कमी सोडियमयुक्त आहार घ्यावा. ओट्समध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी हे सर्वोत्कृष्ट खाद्य मानले जाते. तसेच ओट्स बनवणे देखील खूप सोपे आहे.
फळे आणि दही
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे दह्याचे सेवन केले पाहिजे. बर्याच अभ्यासांमध्ये उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी दही लाभदायी असल्याचे म्हटले आहे. परंतु, दही सेवन करताना त्यामध्ये साखर, मीठ किंवा कोणत्याही प्रकारची ‘चव’ घालणे टाळा. अधिक पौष्टिकतेसाठी आपण त्यात काही बारीक चिरलेली फळे घालून ते खाऊ शकता (Healthy Breakfast for high blood pressure patients).
अंडी
बर्याच लोकांना न्याहरीत अंडी खायला आवडतात. अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, जो नाश्त्यासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो. आरोग्य तज्ज्ञ उच्च रक्तदाब असणाऱ्यांना अंडी खाण्याचा विशेष सल्ला देतात. उकडलेले अंडी खाऊन दिवसाची सुरुवात करणे, आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरते. जर, तुम्हाला अंड्याची पोळी खायची असेल, तर त्यात चिरलेल्या भाज्या देखील घाला.
नट्स, सीड्स आणि लो फॅट डेअरी प्रोडक्ट
आरोग्य तज्ज्ञ उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना आहारात अधिक पोटॅशियम घेण्याची शिफारस करतात. नट्स आणि सीड्समध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळते, जे रक्तदाबात खूप फायदेशीर आहे. नाश्त्यामध्ये आपण एक ग्लास दुधासह काही काजू किंवा सीड्स खाऊ शकतात. भोपळ्याच्या बिया, पिस्ता, बदाम, काजू आणि अक्रोड हे उच्च रक्तदाबात सर्वोत्कृष्ट मानले जातात.
केळी आणि बेरी
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. तर, त्यात सोडियम अजिबात नसते आणि अँटी-ऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात आढळतात. हे घटक रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदय निरोगी ठेवतात. आपण केळ्यासह बेरी देखील खाऊ शकता. सर्व आवश्यक जीवनसत्त्वे बेरीजमध्ये म्य्बालक प्रमाणात आढळतात.
(टीप : डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
(Healthy Breakfast for high blood pressure patients)
हेही वाचा :
हिवाळ्यात वारंवार ‘उच्च रक्तदाबा’ची समस्या उद्भवतेय? मग ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या!#bloodpressurebreak | #BloodPressure | #healthcare | #lifestylehttps://t.co/sejhGkGwve
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 1, 2021