Tea Benefits | मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायी ‘वेलचीयुक्त चहा’, ‘या’ प्रकारे करा सेवन

वेलची मधील अँटीऑक्सिडंट, अँटीइंफ्लेमेटरी प्रॉपर्टी आणि हायपोलीपिडेमिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

Tea Benefits | मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायी ‘वेलचीयुक्त चहा’, ‘या’ प्रकारे करा सेवन
वेलचीयुक्त चहा
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 2:52 PM

मुंबई : भारतीय स्वयंपाकघर विविध प्रकारच्या मसाल्यांचे भांडार आहे.  त्यात पदार्थाचा स्वाद वाढवण्यापासून ते विविध आजार बरे करण्यापर्यंतचे सगळे घटक आहेत. यात असे काही मसाले आहेत, जे जवळजवळ सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी दररोजच्या स्वयंपाकात वापरले जातात. याचबरोबर असे काही मसाले आहेत जे केवळ काही निवडक खाद्यपदार्थांमध्ये वापरले जातात. या निवडक मासाल्यांपैकी एक म्हणजे ‘वेलची’. आपल्या घरात मिठाई, खीर किंवा चविष्ट बिर्याणी बनवताना आपण त्यात वेलचीचा वापर करतो (Healthy Cardamom tea for diabetes patients).

काही लोक मुख दुर्गंधी दूर करण्यासाठी जेवणानंतर वेलचीचे दाणे चवतात. त्याचबरोबर काही घरांमध्ये चहाची चव वाढवण्यासाठीही वेलची वापरली जाते. वजन कमी करण्यासाठी आणि औदासिन्याच्या काही लक्षणांमध्ये तसेच उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी वेलची मदत करते. खरे तर वेलची युक्त चहा सेवन केल्याने मधुमेहाचा देखील प्रतिकार होतो. वेलचीच्या प्रभावांवरील असंख्य वैज्ञानिक अभ्यासानुसार, या मसाल्याच्या पदार्थातील अँटीऑक्सिडंट, अँटीइंफ्लेमेटरी प्रॉपर्टी आणि हायपोलीपिडेमिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. म्हणून हा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरतो.

मधुमेहाचा सामना करण्यासाठी वेलची चहा बनवण्याच्या पद्धती :

आले-वेलची चहा

1 कप चहासाठी 2 वेलची बारीक ठेचून घ्या आणि उकळत्या पाण्यात घाला. नंतर यात चहाची पाने आणि दूध घाला. झाला तुमचा आरोग्यदायी चहा तयार! जर आपण उकळत्या पाण्यात वेलचीसह आले ठेचून टाकले, तर ते आपल्या चहाची चव आणि आरोग्य देखील वाढवेल. गोडीसाठी आपण यात एखादा चमचा मध घालू शकता. परंतु, प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या (Healthy Cardamom tea for diabetes patients).

वेलची-काळी मिरी चहा

चहाच्या एका कपासाठी, उकळत्या पाण्यात 2 वेलची, 2 लवंग, 2 अख्या काळी मिरी आणि अर्धा इंच दालचिनी तुकडा घाला. मंद आचेवर ठेवा आणि कमीतकमी अर्धा तास तरी उकळी येऊ द्या. उकळ्यानंतर पुन्हा थोडे पाणी आणि दूध घालून एक उकळी काढा.

ब्लॅक टी

2 वेलची घ्या आणि सोलून त्या एक कप पाण्यात टाकून त्याला उकळी येऊ द्या. बारीक उकळी आल्यावर त्यात चहाची पाने घालून पुन्हा उकळी येऊ द्या. आता ही चहा गळून घ्या आणि प्या.

आपण आपला चहा आपल्या आवडीनुसार बनवू शकता. वेलचीला एक वेगळाच गोडपणा आहे, म्हणून त्यात अधिकचे गोड घालणे टाळा. तसेच, आपण इच्छित असल्यास, त्यात एखादा दालचिनीचा तुकडा देखील टाकू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Healthy Cardamom tea for diabetes patients)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.