Green Juice | मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी ‘ग्रीन ज्यूस’ गुणकारी, वाचा या रसाचे फायदे…

| Updated on: Jan 19, 2021 | 3:15 PM

आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. भारतात जवळपास प्रत्येक तिसरा व्यक्ती मधुमेहाचा रुग्ण आहे.

Green Juice | मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी ‘ग्रीन ज्यूस’ गुणकारी, वाचा या रसाचे फायदे...
Follow us on

मुंबई : आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. भारतात जवळपास प्रत्येक तिसरा व्यक्ती मधुमेहाचा रुग्ण आहे. या धावपळीच्या जगतात आपल्या चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे बरेच लोक टाईप-2 मधुमेहाने ग्रस्त आहेत. भारतातील सुमारे 70 दशलक्ष लोक या आजाराने त्रस्त आहेत. म्हणूनच भारताला जगाची ‘कॅपिटल ऑफ डायबीटीस’ असेही म्हणतात (Healthy Green Juice for diabetes patients).

परंतु, हिरव्या भाज्या आणि फळांच्या रसाचे सेवन करून मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. इतकेच नाही तर हा रस आपल्या शरीरास शुद्ध करतो आणि बर्‍याच रोगांपासून आपले संरक्षण करतो. चला तर, या निरोगी रसाबद्दल जाणून घेऊया…

कसा बनवायचा हा हेल्थी रस?

हा रस तयार करण्यासाठी आपल्याकडे असलेले हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, हिरवी कोबी, हिरव्या भाज्या, पालक, बीट, लसूण, टोमॅटो, आले किंवा कारले, यापैकी कोणत्याही चार-पाच गोष्टी वापरू शकता. .

रस बनवण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी बारीक चिरून घ्या आणि गरजेनुसार त्यात पाणी टाकून, मिक्सरच्या मदतीने ‘हेल्थी ज्यूस’ तयार करा.

मधुमेहाच्या रूग्णासाठी ‘ग्रीन ज्यूस’ निरोगी!

मधुमेह असलेल्या रुग्णांना बर्‍याचदा कोणताही ज्यूस पिण्यास मनाई असते. कारण त्यात साखर जास्त प्रमाणात असते. परंतु हा निरोगी रस खास मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी आहे. मधुमेह कमी करण्यासाठी ग्रीन ज्यूस अत्यंत फायदेशीर ठरतो. टाईप-1, टाईप-2 आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मधुमेह अशा सर्व प्रकारच्या मधुमेहावर हा रस तितकाच फायदेशीर आहे. या ग्रीन ज्यूसमुळे आपल्या शरीराची उर्जा पातळी लवकर वाढते. नियमित सकाळी या रसाचे सेवन करावे (Healthy Green Juice for diabetes patients).

ग्रीन ज्यूसचे फायदे

जीवनसत्त्वांचा स्त्रोत

हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, पालक, कारले, टोमॅटो आणि लसूण यासारख्या निरोगी वस्तूंपासून बनवलेले हा रस व्हिटामिन-ए, व्हिटामिन-सी, व्हिटामिन-के आणि लोहाचा चांगला स्रोत आहे.

ऊर्जा वाढवतो

अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध, हा ‘ग्रीन ज्यूस’ आपल्याला अनेक हानिकारक आजारांपासून वाचवतो. त्याच वेळी, हा रस आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवतो आणि दिवसभर आपली ऊर्जा देखील वाढवतो. याचबरोबर शरीरात चयापचय क्रिया देखील सुरळीत करतो.

रक्तदाब नियंत्रित करतो

‘ग्रीन ज्यूस’ केवळ मधुमेहासाठीच चांगला नाही, तर उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका देखील कमी करतो. रोगाचा धोका कमी करण्याव्यतिरिक्त, हा रस आपल्या शरीरातील इतर अवयवांचे कार्य सुधारतो.

रक्त शुद्ध करतो

कारले आणि बीट आपले रक्त शुद्ध करते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. परंतु या रसातील कारले आणि बीट याशिवाय हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, आले, लसूण आणि टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात आहेत. या कारणास्तव, हा ज्यूस आपले रक्त शुद्ध करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

(Healthy Green Juice for diabetes patients)

हेही वाचा :