Healthy Poha Recipes : पोहेंचा वापर करून बनवा हे चमचमीत अन् स्वादिष्ट पदार्थ, एकदा खाल तर वारंवार मागाल!!

Healthy Poha Recipes : पोहे अनेकदा आपण नाश्ता करताना खात असतो. पोहे पचायला अतिशय हलके आणि स्वादिष्ट असतात.पोह्यांपासून आपण अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो.

Healthy Poha Recipes : पोहेंचा वापर करून बनवा हे चमचमीत अन् स्वादिष्ट पदार्थ, एकदा खाल तर वारंवार मागाल!!
पोह्यांपासून बनवा अनेक पदार्थImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 10:40 PM

नाश्ता बनवण्यासाठी पोहे अतिशय महत्त्वाचा पर्याय मानला जातो. पोह्यांचा वापर करून आपण वेगवेगळे पदार्थ (Poha Recipes) देखील बनवू शकतो. पोहे हे पचायला अतिशय हलके (Breakfast Recipes) आणि चवीला स्वादिष्ट असतात त्याचबरोबर आपल्या शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी पोहे (Poha) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पोह्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतात. पोह्यामध्ये कॅलरीची मात्रा कमी असते त्याचबरोबर पोहे प्रोबायोटिक म्हणून एक चांगला पर्याय मानला जातो. पोहे मध्ये कार्बोहाइड्रेट भरपूर प्रमाणात असतात.जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे आहे तर अशावेळी आहारामध्ये पोह्यांचा आवश्यक समावेश करा. पोहे बनवण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो आणि म्हणूनच पोह्याद्वारे वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकतात. चला तर मग जाणून घ्या आपल्या भावाच्या मदतीने कोणकोणते पदार्थ बनवायचे आहेत त्याबद्दल…

झटपट बनवा पोहे पराठा

हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी पोहे, एक छोटा चमचा जिरा पावडर, एक छोटा चमचा आले-लसूण यांची पेस्ट,एक छोटा चमचा लाल मिरची पावडर ,अर्धा कप गव्हाचे पीठ ,एक चमचा मोहरी तेल, एक छोटा चमचा हिरवी मिरची, एक कप आणि चिमूटभर हळद दोन उकळलेले बटाटे, दोन मोठे चमचे कापलेली कोथिंबीर, एक कप किसलेले गाजर आणि आवश्यकतेनुसार मीठ लागणार आहे.

पोहे पराठा बनवण्याची विधी

आपल्याला पोहे मिक्सर मध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये तेल, जिरे पावडर, हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट आणि एक चिमूटभर हळद पावडर टाकायचे आहे त्यानंतर एक कप पाणी आवश्यकतेनुसार मीठ आणि पोहे यांचे बारीक मिश्रण टाकायचे आहे. जेव्हा पोह्यांचे मिश्रण घट्ट होईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे, आता हे मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढायचे आहे. किसलेले गाजर उकळलेले बटाटे, हिरवी कोथिंबीर, चवीनुसार मीठ मैदा टाकून सर्व पदार्थ आपल्याला एक जीव करायचे आहे आणि गव्हाचे पीठ टाकून आपल्याला कणीक मळायची आहे. कणिक मउ बनवण्यासाठी यामध्ये थोडीशी दही मिक्स करा.आता आपल्याला या पिठाचे पराठे बनवायचे आहेत. या पराठ्याना गरम तवावर भाजायचे आहे. या पराठ्याना दोन्ही बाजूने तूप लावून तुम्ही खाऊ शकता.

स्वादिष्ट पोहे लाडू

स्वादिष्ट पोहे लाडू बनवण्यासाठी आपल्याला 250 ग्रॅम पोहे, एक कप बारीक किसलेले खोबरे, एक मोठा चमचा तूप,चार मोठे चमचे काजू ,एक चमचा इलायची पावडर ,एक कप गूळ ,दोन चमचे मनुके आणि अर्धा कप तूप लागणार आहे.

पोहे लाडू बनवण्याची विधी

आता आपल्याला कढई घ्यायची आहे. त्या कढई मध्ये पोहे छान पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून कमीत कमी दहा मिनिटं पोहे भाजून घ्यायचे आहेत.काही वेळानंतर पोहे थंड होऊ द्या.आता या पोह्यांना मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर बनवा. आपल्याला एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचे आहे त्यानंतर बारीक किसलेले खोबरे मिक्स करून हे मिश्रण आपल्याला हलकेसे तपकिरी रंगाचे होऊ द्यायचे आहेत त्यानंतर खोबरे आणि गूळ यांना मिक्सरमध्ये टाकून यांची बारीक पावडर बनवून घ्या त्यानंतर एका बाऊलमध्ये गुळ ,नारळाची पावडर ,इलायची पावडर वाटलेले पोहे एकत्रित मिक्स करायचे आहे. कढईमध्ये टाकलेले तूपामध्ये काजू आणि मनुका भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर सगळे पदार्थ मिक्स करून आपल्याला लाडू बनवायचे आहेत.या लाडूंची सजावटीसाठी तुम्ही लाडू मध्ये बदाम ,काजू मिक्स करू शकतात,अशा प्रकारे पोह्याचे लाडू तयार झाले आहेत.

पापी लोकांनी ‘या’ झर्‍यापासून लांबच रहावे!, देवभूमी उत्तराखंडमधल्या ‘या’ धबधब्यात असं काय आहे?

Health Care : कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवायची आहे? उन्हाळ्यात या पदार्थांचा आहारात समावेश करा!

Hair Care Tips : सुंदर आणि निरोगी केसांसाठी ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा!

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.