दात किती मिनिटे घासले पाहिजेत? 90 % लोक करतात ही चूक,त्यामुळे दात लवकर किडतात
आपण तर दातांची निगा राखली नाही तर दात पिवळे पडतात किंवा किडतात, मग तोडांतून दुर्गंधी येऊ लागते. हे सर्व टाळण्यासाठी आधी आपल्याला हे माहित असलं पाहिजे की दात हे नक्की किती वेळा घासले पाहिजेत हे बऱ्याच जणांना माहितही नसतं त्यामुळे दाताच्या समस्या निर्माण होतात.
आपण आपल्या शरीराची सर्व प्रकारे काळजी घेतो. बॉडिवॉशपासून ते फेसवॉशपर्यंत. शरीरातून घामाचा वैगरे दुर्गंध येऊ नये म्हणून महागडे पर्फ्यूम वापरतो. पण तेवढी काळजी आपण आपल्या दातांची घेतो का., तर नाही. कारण आपल्याला वाटतं की एक किंवा दोन वेळेस ब्रश केलं की झालं. दात स्वच्छ होतात. पण तसं नाहीये.
निगा राखली नाही तर दात पिवळे पडतात, किडतात
आपण जर दातांची निगा राखली नाही तर दात पिवळे पडतात किंवा किडतात, मग तोडांतून दुर्गंधी येऊ लागते. हे सर्व टाळण्यासाठी आधी आपल्याला हे माहित असलं पाहिजे की दात हे नक्की किती वेळा घासले पाहिजेत हे बऱ्याच जणांना माहितही नसतं त्यामुळे दाताच्या समस्या निर्माण होतात.
मग दात नेमके घासावे तरी कसे असा प्रश्न पडला असेलच. चला तर मग जाणून घेऊयात की नेमके दात कसे घासावे आणि किती वेळापर्यंत घासावे.
दातांचं काम असतं अन्न बारीक करून पुढे शरीरात ढकलणं. जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी दात भक्कम असायला हवे. दात दुखू लागले की, वेदना अगदी असह्य होतात. दात किडले किंवा पिवळे पडले की, आत्मविश्वासानं हसता येत नाही. तर, तोंडातून दुर्गंधी आल्यास लोक खिल्ली उडवतात.
नक्की दात कसे घासावे आणि किती वेळ ?
तज्ज्ञ सांगतात, कमीत कमी 3 मिनिटांपर्यंत दात घासावे, त्यापेक्षा जास्त वेळ ब्रश करू नये. 3 मिनिटांत दात व्यवस्थित स्वच्छ होऊ शकतात. तोंड बंद करून ब्रश करावं. यामुळे ब्रश जास्त आत दातांपर्यंत जाऊ शकतो.
काहींना फोन पाहाताना किंवा शौचालयात बसून तासंतास ब्रश करण्याची सवय असते. पण असे करणे चुकीचे आहे. कारण असं गेल्याने ब्रश आणि टूथपेस्ट ही तशीच तोंडात बराच वेळ राहते. त्यामुळे दातांचे आणि हिरड्यांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे उगाच तासंतास ब्रश असाच तोंडात धरून बसू नये.
दर 3 महिन्यांनी टूथपेस्ट बदलावी. पेस्टच्या क्वालिटीवरही दातांची स्वच्छता अवलंबून असते. तसेच ब्रश करताना तो नेहमी सर्क्युलर मोशनमध्ये फिरवावा. त्यामुळे वर, खाली सर्व ठिकाणी, दातांच्या मध्ये, कोपऱ्यातील घाण निघून जाते.
रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्याची किंवा चूळ भरण्याती सवय लावावी
सकाळी तर तसे सर्वजण दात घासतात, परंतु रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्याची सवयही लावून घ्यायला हवी. नाहीतर रात्रभर अन्नाचे कण अडकून राहिल्यास दात किडू शकतात. ब्रश करायचं नसेल तर निदान रात्री चूळ भरून झोपावं. अनेकजण रात्री जेवण झालं की थेट झोपी जातात. त्यामुळे दिवसभर खाल्लेल्या अन्नाचे कण दातात तसेच राहतात आणि दाताला किड लागते.
दातांना किड लागण्यामागे 90% वाटा असतो गोड पदार्थांचा. त्यामुळे जेव्हा जेव्हा गोड खाल तेव्हा तेव्हा चूळ भरावी. जे लोक सतत चहा पितात, त्यांनी तर चूळ भरायलाच हवी. या टिप्स फॉलो केल्यामुळे दात वर्षानुवर्षे भक्कम राहू शकतात.आणि किडही लागणार नाही.