Watermelon Seeds Benefits : कलिंगडाच्या बियांमध्ये आरोग्यदायी खजिना, सेवनाने होतील 5 फायदे

कलिंगडात असलेले मॅग्नेशियम हृदयासाठी फायदेशीर असतात. हे मेटाबॉलिक सिस्टमला साहाय्य करतात आणि उच्च रक्तदाबासाठीही उपयोगी ठरतात.(Healthy treasure hidden in watermelon seeds, 5 benefits if consumed)

Watermelon Seeds Benefits : कलिंगडाच्या बियांमध्ये आरोग्यदायी खजिना, सेवनाने होतील 5 फायदे
कलिंगडच्या बियांमध्ये लपलाय आरोग्यदायी खजिना
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 9:51 AM

मुंबई : कलिंगडमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, फोलेट, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, तांबे, जस्त इ. असतात. हे सर्व शरीरासाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत. बियाणे प्रतिकारशक्ती वाढवते. मॅग्नेशियमच्या अस्तित्वामुळे उच्च रक्तदाब सुरळीत करण्यात मदत करते. कलिंगडच्या बियांमध्ये कॅलरीची संख्या खूप कमी असते. आपण हे स्नॅक्स किंवा सुकवून किंवा भाजून खाऊ शकता. कलिंगडाच्या बियांमध्ये आयरन, पोटॅशियम, मिनरल्स आणि विटामिन्स असतात. या बिया आपण चावून खाऊ शकता किंवा बियांचे तेल काढूनही त्याचा वापर करू शकता. याच्या बिया खाल्ल्याने त्वचा तेजस्वी होते आणि केसदेखील दाट होतात. कलिंगडात असलेले मॅग्नेशियम हृदयासाठी फायदेशीर असतात. हे मेटाबॉलिक सिस्टमला साहाय्य करतात आणि उच्च रक्तदाबासाठीही उपयोगी ठरतात.(Healthy treasure hidden in watermelon seeds, 5 benefits if consumed)

थकवा दूर करते

जर आपल्याला खूप लवकर थकवा येत असेल तर कलिंगडच्या बिया खा. हे शरीराला ऊर्जा प्रदान करते आणि थकवा दूर करते. कलिंगड बियाणे हिमोग्लोबिनसाठी फायदेशीर आहे जे शरीरात ऑक्सिजन पोहचवते. बियांमध्ये असणारे लोह कॅलरीचे उर्जेत रूपांतर करण्यास मदत करते. तसेच रोग प्रतिकारशक्ती सिस्टमला पोषक तत्वे पुरवते.

रक्तदाब सुरळीत ठेवते

कलिंगडच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात, ज्यात अमीनो अॅसिड असतात. यात एक अर्जिनाईन अमीनो अॅसिड असते, ज्याचा उपयोग रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामध्ये उपस्थित मॅग्नेशियम रक्तदाब नियमित करण्यास मदत करते.

हृदयासाठी आरोग्यदायी

कलिंगडच्या बियांमध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड जास्त प्रमाणात असतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. हे फॅट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यात असलेले पोटॅशियम हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

स्नायूंच्या वेदनांपासून आराम देते

स्नायू निरोगी ठेवण्यासाठी आणि वर्कआउटमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी कलिंगडाचया बिया खूप फायदेशीर आहेत. कलिंगडच्या बियांमध्ये एल-सिट्रूलाईन असते जे टिश्यूची देखभाल करण्यास मदत करते. यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

मधुमेहामध्ये फायदेशीर

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी कलिंगड बिया वरदानापेक्षा कमी नाही. ते मधुमेह कमी करण्यात मदत करतात. (Healthy treasure hidden in watermelon seeds, 5 benefits if consumed)

इतर बातम्या

देशातील औषधांच्या निर्यातीला गती, मार्चमध्ये सर्वाधिक उलाढाल

तुम्हीही वर्क फ्रॉम होम करताय? मग या ट्रिक अवलंबल्यास लवकरच होईल लाखोंचा फायदा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.