Lifestyle : भसssभस Perfume न मारता, या ४ टिप्स करा फॉलो, दिवसभर सुगंधासह वाटेल फ्रेश!
जास्त परफ्यूम मारला तर त्याचा वास दिवसभर टिकतो. पण तुम्हाला माहितीये का, परफ्यूम लावायची एक पद्धत आहे ज्यामुळे तुमच्या परफ्युमचा वास दिवसभर टिकण्यास मदत होते.
मुंबई : प्रत्येकजण फ्रेश वाटण्यासाठी परफ्युमचा वापर करत असतात. मग तरूण असो किंवा तरूणी प्रत्येकजण कामाला जाताना, बाहेर फिरायला जाताना किंवा कॉलेजला जाताना परफ्युमचा वापर करतातच. तसेच भरपूर लोकांना असं वाटतं की आपण जास्त परफ्युम मारला तर त्याचा वास दिवसभर टिकतो. पण तुम्हाला माहितीये का, परफ्यूम लावायची एक पद्धत आहे ज्यामुळे तुमच्या परफ्युमचा वास दिवसभर टिकण्यास मदत होते.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी लोकं परफ्युमचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. काही लोकं अशीही असतात ज्यांचा परफ्युम जास्त वेळ टिकतो. पण अशा लोकांचा परफ्युम इतका वेळ कसा टिकतो हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर आज आम्ही तुम्हाला परफ्युम लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकेल.
शॉवर नंतर परफ्युमचा वापर
भरपूर लोकं त्यांचं सगळं आवरून झाल्यानंतर शेवटी परफ्यूम लावतात. पण तुम्हाला माहित आहे का की शेवटी परफ्युम लावण्याची ही चुकीची पद्धत आहे. परफ्युम लावण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे अंघोळ केल्यावर लगेच तो लावावा. अंघोळ झाल्यानंतर, शरीर व्यवस्थित स्वच्छ करा आणि त्यानंतर परफ्युम लावा. त्यामुळे तुमच्या परफ्युमचा वास दीर्घवेळ टिकण्यास मदत होईल.
बॉडी लोशन नंतर परफ्यूमचा वापर
तुमच्या परफ्युमचा वास बराच काळ टिकण्यासाठी आधी क्रीम किंवा बॉडी लोशन लावा. त्यानंतर पल्स पॉइंटवर परफ्युम लावा. या ठिकाणी शरीरातील उष्णता अधिक पसरते, त्यामुळे परफ्युमचा वास तीव्र होतो.
शरीराच्या या ठिकाणी परफ्यूम लावा
भरपूर लोकांना शरीराच्या त्या भागांबद्दल माहिती नसतं, जिथे परफ्युम लावल्यानंतर बराच वेळ सुगंध राहतो. बेली बटण आपल्या पल्स पॉइंटमध्ये येते, जिथून जास्त उष्णता येते. त्यामुळे येथे परफ्युमचा वास बराच काळ टिकतो.
केसांवर परफ्यूम मारू नका
काही लोकांना केसांवर परफ्यूम लावणे आवडते. पण परफ्युममध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस लवकर सुकतात आणि सुगंध जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे केसांवर परफ्युम वापरू नये.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)