ड्रोन गोळा करणार रक्ताचे नमुने!
मुंबई : आजवर तुम्ही ड्रोन कॅमेरा खासगी ठिकाणी, लग्न-समारंभ आणि राजकीय सोहळ्यांमध्ये पाहिला असेल, मात्र आता याच ड्रोनचा वापर रक्ताचे नमुने आणि औषधे गोळा करण्यासाठी केला जाणार आहे. ड्रोनद्वारे रक्त गोळा करण्याचा अभिनव प्रयोग हिमाचल प्रदेश सरकारकडून राबविला जात आहे. सुरूवातीला पायलट प्रयोग म्हणून राबविला जाणार असून यात यश आल्यास सर्वत्र राज्यात हा प्रयोग पार राबवला जाईल. प्रारंभी कुलू […]
मुंबई : आजवर तुम्ही ड्रोन कॅमेरा खासगी ठिकाणी, लग्न-समारंभ आणि राजकीय सोहळ्यांमध्ये पाहिला असेल, मात्र आता याच ड्रोनचा वापर रक्ताचे नमुने आणि औषधे गोळा करण्यासाठी केला जाणार आहे. ड्रोनद्वारे रक्त गोळा करण्याचा अभिनव प्रयोग हिमाचल प्रदेश सरकारकडून राबविला जात आहे. सुरूवातीला पायलट प्रयोग म्हणून राबविला जाणार असून यात यश आल्यास सर्वत्र राज्यात हा प्रयोग पार राबवला जाईल.
प्रारंभी कुलू जिल्ह्यात दुर्गम भागातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने गोळा केले जाणार आहे. रक्ताचे नमुने गोळा केल्यानंतर हे सर्व नजीकच्या शासकीय रूग्णालयात पाठवून नमुने तपासले जातील. अशी माहिती हिमाचल सरकारकडून देण्यात आली आहे
तसेच, तपासणी झालेल्या नमुन्यांमध्ये दोष आढळल्यास ड्रोनद्वारेच त्या नागरिकांना औषधे पुरवण्यात येतील. डिसेंबर महिन्यापासून प्रयोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवला जाणार आहे.
ड्रोनच्या सहाय्याने जवळच्या जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करून त्याचे अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना मेलवर पाठवले जातील. समजा, ड्रोनचा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण हिमाचल राज्यात राबवला जाणार आहे.