हिमाचलच्या कुल्लू-मनालीला कर बाय-बाय आणि ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या एकदा भेट
हिमाचलचे नाव ऐकताच लोकांना धर्मशाळा, चंबा आणि मनाली आठवतात. पण इथे एक अशी जागा देखील आहे, ज्याबद्दल फक्त काही लोकांनाच माहिती आहे. तुम्हाला इथे लोकांची गर्दी दिसणार नाही. चला जाणून घेऊया या सुंदर ठिकाणाबद्दल...

हिमाचल प्रदेश त्याच्या सुंदर दऱ्यांसाठी ओळखले जाते. येथील सुंदर दृश्ये तुमचे मन मोहून टाकतील. त्यातच जेव्हा केव्हा आपण हिमाचलचे नाव घेतो तेव्हा धर्मशाळा, कुल्लू-मनाली यासारख्या ठिकाणांची नावे आपल्या मनात येतात. उन्हाळा आला आहे आणि या ठिकाणी बरीच गर्दी पाहायला मिळते. पण जर तुम्हाला उन्हाळ्यात हिमाचलमधील एखाद्या वेगळ्या ठिकाणी भेट द्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला एका अद्भुत ठिकाणाबद्दल सांगत आहोत. या ठिकाणाचे नाव कारसोग आहे. इथे असे नैसर्गिक दृश्ये आहेत जिथून तुम्हाला परत यावेसे वाटणार नाही. इथे आल्यावर तुम्हाला एखाद्या मुक्त पक्ष्यासारखे वाटेल.
खूप सुंदर आहे हिमाचलच कारसोग
कारसोग मंडीपासून 125 किमी अंतरावर आहे. शिमला पासून त्याचे अंतर 100 किलोमीटर आहे. येथील खास गोष्ट म्हणजे या ठिकाणी गर्दी अजिबात पाहायला मिळत नाही. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही.
तर या कारसोगला मंदिरांचे शहर असेही म्हणतात. पण येथील लोकसंख्या चांगली आहे. येथे कामरुनाग मंदिर आणि शिखरी देवी मंदिर आहे. रसोगमध्ये सर्वत्र हिरवळ आहे जी येथे येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेते. कामाक्षा देवी आणि महुनागचे मंदिर कारसोग खोऱ्यात खूप लोकप्रिय आहे. कारसोग व्हॅलीला गूढ आणि मंदिरांची व्हॅली असेही म्हणतात.
पांडवांचे मंदिर
कारसोग खोऱ्यात ममलेश्वर मंदिर देखील आहे. असे म्हटले जाते की हे मंदिर पांडवांशी संबंधित आहे. यात असे सांगितले जाते की पांडवांनी त्यांचा वनवासाचा काळ याच ठिकाणी घालवला होता. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे येथे 5 शिवलिंगे आहेत, जी पांडवांनी स्थापित केली होती. येथे एक ढोल देखील आहे, जो भीमाचा असल्याचे म्हटले जाते.
कामरू नाग ट्रेक
तसेच ज्या लोकांना ॲडव्हेंचर करायला आवडत असेल त्यांच्यासाठी कारसोग हे एक उत्तम ठिकाण आहे. रोहांडा येथून 22 किमी अंतरावर आहे, जिथून कामरू नाग ट्रेक सुरू होतो. येथील पर्वतांचे आणि बर्फाळ आच्छादनाचे विहंगम दृश्य पाहून तुम्हाला अपार मनःशांती मिळेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही या कमी गर्दीच्या ठिकाणी भेट देऊ शकता.
कारसोग कसे पोहोचायचे
तुम्ही जर मुंबईत राहणारे असाल तर ट्रेन किंवा फ्लाईटने तुम्ही डायरेक्ट हिमाचला जाऊ शकता. किंवा दिल्लीला उतरून पुढीन प्रवास करू शकता. कारण तुम्हाला दिल्लीहून कारसोगला जायचे असेल तर तुम्ही ट्रेनने कालकाजीला पोहोचू शकता. पुढील प्रवासासाठी तुम्हाला बस किंवा टॅक्सी घ्यावी लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दिल्लीहून मंडीला जाऊ शकता आणि तिथून बस पकडू शकता.