तुमच्या आवडत्या ‘Christmas Tree’चा रंजक इतिहास, जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी…

ख्रिस्ती बांधवांचा सण नाताळ अर्थात ख्रिसमसच्या सेलिब्रेशनला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.

तुमच्या आवडत्या ‘Christmas Tree’चा रंजक इतिहास, जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी...
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 2:09 PM

मुंबई : ख्रिस्ती बांधवांचा सण नाताळ अर्थात ख्रिसमसच्या सेलिब्रेशनला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. नाताळचा उत्सव जगभरात जोशात साजरा केला जातो. जगातील सर्व चर्च या दिवशी सजवले जातात. ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांना भेटतात आणि शुभेच्छांसह छान छान भेटवस्तू देतात. या सगळ्या उत्सवाच्या माहोलात एक गोष्ट असते जी अगदी लहानांपासून मोठ्यांना देखील आकर्षित करते ती म्हणजे ‘ख्रिसमस ट्री’. एक सुंदर झाड, ज्यावर छान छान भेटवस्तू ठेवलेल्या असतात. लोक या ख्रिसमस ट्रीला अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवतात. पण आपल्याला या ‘ख्रिसमस ट्री’चा इतिहास माहित आहे का? चला तर जाणून घेऊया, या ‘ख्रिसमसच्या ट्री’चा इतिहास आणि त्याला इतका सजवण्याचे खास कारण… (History Of Christmas Tree and some facts about this tree)

ख्रिसमस ट्रीचा इतिहास काय आहे?

1) प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीच ख्रिसमस ट्री किंवा सदाहरित असणाऱ्या वृक्षाला जास्त महत्त्व देण्यात आले होते. इजिप्त आणि रोम शहरांत त्यांच्या घरांमध्ये सदाहरित वृक्ष ठेवणे शुभ मानले जात असे.

2) रोम साम्राज्यात ही सदाहरित असणारी झाडे घर सजवण्यासाठी वापरली जात असत.

3) ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सर्वप्रथम जर्मनीमध्ये, इसवी सन 1500मध्ये सुरु झाली.

4) ख्रिस्ती धर्माचे सोळाव्या शतकातील सुधारक मार्टिन ल्यूथर यांनी या झाडाला घरी आणून सजवण्यास सुरुवात केली. वास्तविक एकदा एकदा मार्टिन ल्यूथर 24 डिसेंबरच्या संध्याकाळी एका बर्फाच्छादित जंगलात फिरत होते. जिथे त्यांना हे सदाहरित झाड दिसले. चंद्राच्या प्रकाशाने या झाडाच्या फांद्या चमकत होत्या. त्याचे सौंदर्य पाहून भूललेले मार्टिन लूथर ते झाड घेऊन घरी आले आणि घरात हा सदाहरित वृक्ष लावला. या झाडाला लहान लहान मेणबत्त्या सजवले गेले. त्यानंतर त्यांनी येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ सदाहरित वृक्ष देखील सजविला आणि मेणबत्तीने हे झाड प्रकाशित केले.

5) त्यानंतर ख्रिसमसच्या झाडाची विक्री प्रथम अमेरिकेत 1800मध्ये झाली. अमेरिकेतील एका व्यापाऱ्याने सन 1851मध्ये ख्रिसमसच्या झाडाची विक्री सुरू केली.

6) अहवालानुसार अमेरिकेत दरवर्षी 20 ते 30 दशलक्ष ख्रिसमस ट्री विकले जातात. येथील बहुतेक शेतात अनेक ख्रिसमस ट्री तयार केले जातात.

(History Of Christmas Tree and some facts about this tree)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.