Holi 2021 | कोरोना काळात होळी साजरी करण्याची चिंता वाटतेय? मग, ‘या’ प्रकारे करा घरच्या घरी आयोजन!

गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होळी साजरी करता आली नव्हती. यावर्षीसुद्धा कोरोनामुळे काहीशी अशीच स्थिती आहे. पण, तरीही काळजी करण्याची काही गरज नाही.

Holi 2021 | कोरोना काळात होळी साजरी करण्याची चिंता वाटतेय? मग, ‘या’ प्रकारे करा घरच्या घरी आयोजन!
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 12:36 PM

मुंबई : होळी (Holi 2021) हा सण अगदी जवळ आला आहे आणि आपल्यातील बहुतेक लोक असा विचार करत आहेत की, आपण सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या साथीतीत हा सण कसा साजरा कसा साजरा करणार आहोत? या विचारत आपण सगळेच गर्क झाले आहोत. यंदाच्या वर्षी आपण नेहमीप्रमाणे आणि सर्वसाधारणपणे उत्सव साजरे करू शकणार नाही. होळी म्हणजे दरवर्षी पाण्याची बरसात आणि रंगाची उधळण असते. मात्र, यंदा या सगळ्याच गोष्टींवर रोख लावण्यात आला आहे (Holi 2021 know how to play safe holi at home).

गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होळी साजरी करता आली नव्हती. यावर्षीसुद्धा कोरोनामुळे काहीशी अशीच स्थिती आहे. पण, तरीही काळजी करण्याची काही गरज नाही. कोरोना तर काय झालं? याचा अर्थ असा नाही की, आपण उत्सवाचा आनंद घेणार नाही किंवा उत्सव साजरा करणार नाही. आपण आपल्या घरीच संपूर्ण काळजी घेऊन हा सण साजरा करू शकता.

होळीच्या सणानिमित्त, यंदा आपण आपल्या घरातील सदस्यांसमवेत घरच्या घरीच होळी साजरी  करू शकता. घरीच काही छोटेखाणी कार्यक्रम आयोजित करून आपण आपल्या कुटुंबाला या सणाचा आनंद देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी सुरक्षित होळीचा आनंद घेण्यासाठी कोणत्या पद्धती वापरता येतील…

होळीच्या निमित्ताने खास जेवणाचे आयोजन…

होळीच्या निमित्ताने आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घरात अनेक पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांमध्ये गुजिया, चिल्लई, पकोडे इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. म्हणूनच होळीचा खास आनंद साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह घरच्या घरी खास पदार्थ बनवू शकता. तसेच, खास जेवणाचे आयोजन करू शकता आणि घरीच सुरक्षितपणे हा उत्सव साजरा करू शकता (Holi 2021 know how to play safe holi at home).

बाल्कनीमध्ये खेळा होळी

जर आपण बाहेर जाऊन होळी खेळू शकत नसाल, तर आपल्या घरातील सदस्यांसह आपल्या बाल्कनीमध्ये सुक्या रंगाने होळी खेळू शकता.

होळीच्या गाण्यांवर धमाल करा!

होळीच्या सणाची धमाल गाणी इंटरनेटवर आढळतात. ‘रंग बरसे’ ते ‘अंग से अंग लगाना’पर्यंतच्या सगळ्या गाण्यांची आपण होळी प्लेलिस्ट तयार करू शकता आणि होळीच्या या खास गाण्यांवर आपल्या परिवारासह धमाल डान्स करू शकता.

पिचकारी आणि प्रॉप्ससह खेळा होळी

आपल्या होळीच्या उत्सवाला आणखी खास करण्यासाठी रंगीबेरंगी पिचकाऱ्या आणि मजेदार प्रॉप्स खरेदी करा. लहान मुलांबरोबर लहान व्हा आणि ही होळी मजेशीर मार्गाने घरीच साजरी करा.

(Holi 2021 know how to play safe holi at home)

हेही वाचा :

Osteoporosis Diet : मजबूत हाडांसाठी उन्हाळ्यात खा ही फळे, जाणून घ्या यांचे आरोग्यदायी फायदे

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.