Holi 2021 | कोरोना काळात मुलं होळी कशी खेळणार? तुम्हालाही पडलाय असा प्रश्न तर ‘हे’ वाचा…

होळीचा सण (Holi 2021) आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन येतो. विशेषत: लहान मुले या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. होळीच्या उत्सवाची तयारी अनेक दिवस अगोदरच सुरू होते. परंतु, या वेळी होळी कोरोना काळात साजरी केली जाणार आहे.

Holi 2021 | कोरोना काळात मुलं होळी कशी खेळणार? तुम्हालाही पडलाय असा प्रश्न तर ‘हे’ वाचा...
होळी
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 6:56 PM

मुंबई : होळीचा सण (Holi 2021) आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन येतो. विशेषत: लहान मुले या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. होळीच्या उत्सवाची तयारी अनेक दिवस अगोदरच सुरू होते. परंतु, या वेळी होळी कोरोना काळात साजरी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण एकदा का मुलांनी रंग खेळण्याचा आग्रह धरला की, ते कुणाचेच ऐकत नाहीत. म्हणूनच त्यांच्या होळीच्या दिवसासाठी अशा योजना तयार करा, जेणेकरून त्यांना रंगपंचमीचा मनमुराद आनंद घेता येईल व सुरक्षितही वाटेल. त्यासाठी काही खास टिप्स येथे जाणून घेऊया…(Holi 2021 plan safe holi for childrens)

अशा प्रकारे घ्या मुलांची काळजी :

– सर्वप्रथम, आपल्या मुलांना कोरोना आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल व्यवस्थित माहिती द्या, जेणेकरुन त्यांच्या हे लक्षात येईल की, यावेळी त्यांना घराबाहेर होळी खेळायची नाहीय. त्यांना समजावून सांगा की, तुम्ही यावेळी वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करणार आहात. जर, त्यांना आपला मुद्दा समजला असेल, तर आपले पुढील काम सोपे होईल आणि नंतर ज्या काही योजना केल्या जातील त्या घरगुती असतील.

– आपण बर्‍याच काळापासून मुलांना ज्या गोष्टींची लालूच दाखवून शांत करत आहात, त्यातील एखादी गोष्ट त्यांना पुन्हा द्या. यामुळे, मुलं आपलं म्हणणं आनंदाने ऐकतील.

– मुलांच्या आनंदासाठी त्यांना घरच्या घरी फुलांच्या रंगांनी किंवा नैसर्गिक रंगांनी होळी खेळू द्या. आपण घराच्या अंगणात किंवा गच्चीवर याची व्यवस्था करू शकता. लहान मुले याचा आनंद देखील घेतील आणि त्यांना कोणताही धोका नाही.

– मुलांच्या मनाची तयारी होण्यासाठी यावेळी आपण त्यांना स्वतःचा असा थोडा वेळ द्या. त्यांच्याबरोबर त्यांचा आवडता खेळ खेळा. खेळ प्रत्येक मुलांना आवडतात आणि त्यासाठी ते काहीही करण्यास सहजपणे तयार होतात (Holi 2021 plan safe holi for childrens).

– रंग खेळत असताना मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचीही काळजी घ्या. होळी खेळत असताना त्यांना संपूर्ण स्लीव्हड कपडे परिधान करायला लावा. त्यांच्या त्वचेवर नारळ तेल किंवा मोहरीचे तेल लावा जेणेकरून रंग केमिकल युक्त असतील, तर त्यांचे दुष्परिणाम सहन करावे लागणार नाहीत. याशिवाय पाण्यामध्ये खेळताना मुले आजारी पडू शकतात, यासाठी आवश्यक ते औषध घरी आणून ठेवा. याशिवाय त्यांना मास्क घालायला लावा आणि वेळोवेळी सेनिटायझर वापरण्याची सवय लावा.

अशा प्रकारे तयार करा नैसर्गिक रंग!

जर आपण पाण्याचे रंग तयार करत असाल, तर बीटरूट कापून घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे पाणी लाल रंगाचे होईल. त्याच वेळी, रात्रभर पाण्यात हळद आणि झेंडूची फुले टाकून पिवळा रंग तयार केला जाऊ शकतो.

कोरडे रंग तयार करायचे असतील, तर तुम्ही हळदीमध्ये पीठ घालून पिवळा रंग तयार करू शकता. लाल रंग तयार करण्यासाठी, जास्वंदाची फुले सुकवा आणि तिची पावडर तयार करून, लाल रंग बनवा. जर, हे सोपे वाटत नसेल, तर आपण हर्बल गुलालसह सुक्या रंगाची होळी खेळू शकता.

(Holi 2021 plan safe holi for childrens)

हेही वाचा :

सर्वाधिक धोकादायक रक्ताचा कर्करोग, प्रारंभिक लक्षणे दिसल्यास सावधगिरी बाळगा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत? मग, आजच आहारामध्ये ‘हे’ समाविष्ट करा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.