Holi 2021 | खमंग, लुसलुशीत पुरणपोळी कशी करावी, गृहिणींसाठी खास टिप्स

आज आम्ही तुम्हाला पुरणपोळ्या मऊ कशा करायच्या त्याच्या काही टीप्स देणार आहोत. (Holi Special Puran Poli Recipe)

Holi 2021 | खमंग, लुसलुशीत पुरणपोळी कशी करावी, गृहिणींसाठी खास टिप्स
पुरणपोळी
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 11:59 AM

मुंबई : होळी रे होळी, पुरणाची पोळी…असे म्हणत पुरणपोळीवर तुटून पडणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे. होळी म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती म्हणजे पुरणपोळी. खायला गोड, खमंग, लुसलुशीत लागत असलेल्या पुरणपोळ्या बनवणं म्हणजे खर्चिक काम…. पुरणपोळी बनवायचं म्हटलं तर डाळ नीट शिजेल ना, मैद्याचे पीठ नीट होईल नाही, पोळी गोड होईल ना…असे एक ना हजार प्रश्न गृहिणींना पडतात. जर कोणी पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असतील तर विचारायला नको…कशा होतील, करपणार तर नाहीना? सारण बाहेर येईल का? साखरेचा आणि पीठाचा अंदाज चुकणार नाही ना, असे अंसख्य विचार मनात येतात. (Holi Special Puran Poli Recipe)

प्रत्येक ठिकाणी पुरणपोळी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसेच अनेक महिलांची पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगळी असते. पोळ्या मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबरचं जिभेवर विरघळतील अशा असाव्यात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुरणपोळ्या मऊ कशा करायच्या त्याच्या काही टीप्स देणार आहोत.

साहित्य – 1 कप चणा डाळ, 1 कप किसलेला गूळ, एक कप मैदा, 7 ते 8 टे. स्पून तेल, 1 टी स्पून वेलची पूड, मैदा पोळी लाटण्यासाठी

कृती –

1) कुकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून चणाडाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. डाळ शिजली की, त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी तयार करता येते.

2) डाळीतील पाणी निघून गेल्यावर ती डाळ एका भांड्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालावा. त्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. ते आटवताना वरचेवर ढवळत रहा. जर तुम्ही ते मिश्रण ढवळले नाहीत, तर ते करपू शकतो. या पुरणात चमचाभर वेलची पूड घालावी.

3) मिश्रण घट्ट झाले की गॅसवरून उतरवावे. यानंतर ते मिश्रण गरम असताना पुरण यंत्रातून फिरवून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर ते नीट वाटले जात नाही.

4) यानंतर मैदा घेऊन त्यात 5 ते 6 चमचे तेल आणि थोडीशी हळद मिसळावी. हे पीठ सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पीठ 2 तास ठेवून द्या.

5) यानंतर पुरणाचे दीड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. तर मैद्याच्या पीठाचे अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा. त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.

7) यानंतर पोळपाटावर थोडासा मैदा टाकून हलक्या हाताने पोळी लाटून घ्या. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी. साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी.

8) या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.

पोळी करताना काय काळजी घ्याल?

पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवर ठेवा. तव्यावर पोळी भाजतेवेळी ती सोनेरी लालसर रंग येईपर्यंत भाजा. पुरणपोळी झाल्यावर ती डब्यात किंवा एखाद्या भांड्यात ठेवू नका. ती एखाद्या कागदावर गार होऊ द्या. त्यानंतर त्या पोळ्या डब्यात भरा.  (Holi Special Puran Poli Recipe)

संबंधित बातम्या : 

Holi 2021 | होळीचा शुभ मुहूर्त ते पौराणिक महती, जाणून घ्या सर्व काही

Holi 2021 | आयुष्यात आनंदाचा रंग हवा असेल तर तुमच्या राशीनुसार रंग निवडा आणि उत्साहात होळी साजरी करा…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.