Holika Dahan 2021 | होळीच्या पवित्र अग्नीत अर्पण करा ‘या’ गोष्टी, सगळ्या समस्या होतील दूर…
होलिका दहनला काही ठिकाणी संवत जाळणे देखील म्हटले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. दुसर्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो.
मुंबई : होलिका दहन (Holika Dahan 2021) दरवर्षी फाल्गुनच्या पौर्णिमेच्या तिथीला केले जाते. या दिवशी लोक पूजा करतात आणि काही ठिकाणी एकत्रितपणे ‘होलिका दहन’ केले जातात. होळीची विधिवत पूजा केली जाते. होलिका दहनला काही ठिकाणी संवत जाळणे देखील म्हटले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. दुसर्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी होळी 28 मार्च 2021 रोजी म्हणजे आज आहे (Holika Dahan 2021 offered these things to holi for prosperity).
होलिका दहनच्या दिवशी लोक होलिकाच्या अग्नी भोवती पूजा करतात. असे मानले जाते की, सगळ्या नकारात्मक गोष्टी सर्व या अग्नीत नष्ट होतात. यावेळी लोक आगीत मुख्यतः गव्हाच्या तुऱ्या, गायीच्या शेणाच्या शेणी आणि तीळ अर्पण करून, आपल्या जीवनातील सर्व दु:खे नाहीशी व्हावीत, अशी मागणी करतात. या दिवशी काही विशेष गोष्टी आगीत टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात. चला तर, जाणून घेऊया घरातल्या अशा कोणत्या गोष्टीं होळीत अर्पण केल्याने आनंद व समृद्धी येते…
तीळ अर्पण केल्यास चांगले आरोग्य मिळते
जर तुम्हाला चांगल्या आरोग्याची कामना असेल, तर होलिकाच्या अग्नीत तीळ घाला आणि अग्नीभोवती परिक्रमा करा. यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त मिळते.
आर्थिक सुबत्तेसाठी चंदनाचे लाकूड
होलिका दहनच्या अग्निमध्ये चंदनाचे लाकूड अर्पण करावे. असे केल्याने घरातील पैशांची समस्या, आर्थिक चणचण दूर होते आणि आर्थिक सुबत्ता येते (Holika Dahan 2021 offered these things to holi for prosperity).
नकारात्मक ऊर्जा नाहीशी करण्यासाठी मोहरी
तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जेमुळे अडचणी येत असतील, तर होळीच्या अग्नीत काळी मोहरी अर्पण करा. असे केल्याने नकारात्मक शक्ती जीवनातून काढून टाकल्या जातात आणि जीवनात सकारात्मकता येते.
वैवाहिक समस्यांसाठी हवन सामग्री
आपल्या विवाहित जीवनात जर समस्या चालू असतील तर, होलिकाच्या अग्निमध्ये हवन सामग्री अर्पण करावी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी.
रोगांपासून मुक्त होण्यासाठी वेलची आणि कापूर
आपणास आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर होलिका दहनच्या अग्निमध्ये हिरवी वेलची आणि कापूर अर्पण करा. असे केल्याने आपले आरोग्य चांगले होईल. तसेच, आपला रोगांपासून बचाव होईल.
नोकरीतील समस्यांसाठी पिवळी मोहरी
रोजगाराच्या किंवा नोकरीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, तर होळीच्या आगीत पिवळी मोहरी अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला रोजगाराच्या समस्येपासून मुक्तता मिळेल. तसेच, आपला व्यवसायही वाढेल.
(टीप : वरील माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)
(Holika Dahan 2021 offered these things to holi for prosperity)
हेही वाचा :
Holi 2021 | अंकांनुसार निवडा शुभ रंग, जाणून घ्या कुठल्या रंगाने होळी खेळणे ठरणार तुमच्यासाठी लकी…
holiHoli 2021 | होळीचा शुभ मुहूर्त ते पौराणिक महती, जाणून घ्या सर्व काही
Holi 2021 | होलिका दहनाच्या राखेने घरात करा हे उपाय, सर्व संकटं होतील दूर…https://t.co/18JNFw82Xo#Holi2021 #holikadahan
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2021