Peel Off Mask | निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा ‘पील ऑफ मास्क’

त्वचेवरील डाग काढून टाकण्यासाठी आपण ‘पील ऑफ मास्क’चा वापर करतो. ‘पील ऑफ मास्क’ त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो.

Peel Off Mask | निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा ‘पील ऑफ मास्क’
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 4:41 PM

मुंबई : धूळ, सूर्य किरणे आणि प्रदूषण हे घटक आपल्या त्वचेवर सर्वाधिक परिणाम करतात. ज्यामुळे आपल्या त्वचेला डार्क स्पॉट, मुरुम, पुळ्या यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी त्वचेवरील डाग काढून टाकण्यासाठी आपण ‘पील ऑफ मास्क’चा वापर करतो. ‘पील ऑफ मास्क’ त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ‘पील ऑफ मास्क’ सहज उपलब्ध आहेत. मात्र, बर्‍याचदाहे मास्क त्वचेवर बाधक ठरतात (Home Made Peel Off Mask For healthy and glowing skin).

अशा ‘पील ऑफ मास्क’मुळे बऱ्याचदा त्वचेच्या इतर अनेक अडचणी उद्भवतात. अशा वेळी आपण घरीच्या घरीच केमिकल फ्री ‘पील ऑफ फेस मास्क’ बनवू शकता. निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस तरी ‘पील ऑफ फेस मास्क’ वापरावा. घरच्या घरी पील ऑफ मास्क कसा बनवावा ते जाणून घ्या…

संत्र्याच्या सालीचा ‘पील ऑफ फेस मास्क’

संत्र्याच्या सालीचा ‘पील ऑफ फेस मास्क’ तयार करण्यासाठी संत्र्याची साल कमीतकमी दोन दिवस सूर्यप्रकाशामध्ये वाळवून त्याची पावडर तयार करा. यानंतर एक वाटी पाणी उकळवून, त्यात साखर घाला आणि थोडावेळ शिजू द्या. नंतर या पाण्यात एक चमचा संत्र्याच्या सालीची भुकटी घाला. हा फेस मास्क आपल्या चेहऱ्यावर लावा आणि तो कोरडा झाल्यावर पाण्याने धुवा. यामुळे आपल्या त्वचेवरील काळे डाग कमी होतील आणि त्वचेचा पोत सुधारेल.

सफरचंदाचा ‘पील ऑफ फेस मास्क’

सफरचंदामध्ये मॅलिक अॅसिडचे गुणधर्म आहेत, जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. या घटकामुळे त्वचा चमकदार होते आणि निरोगी राहते. त्वचेवर मेलेनिन उत्पादने वापरल्याने डार्क स्पॉट कमी होतात (Home Made Peel Off Mask For healthy and glowing skin).

हा मास्क तयार करण्यासाठी एक लहान सफरचंद, दोन चमचे दूध आणि मध आवश्यक आहे. प्रथम सफरचंदाची साल काढून ते कापून त्याची पेस्ट बारीक पेस्ट तयार करून घ्या. यानंतर या पेस्टमध्ये दूध आणि मध मिसळा आणि मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

पील ऑफ मास्कचे फायदे

– पील ऑफ मास्क आपल्या त्वचेतील घाण, बॅक्टेरिया आणि मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळण्यासाठी आठवड्यातून दोनदा पील ऑफ फेस मास्कचा वापर करा.

– हा मास्क वापरल्याने आपल्या त्वचेत घट्टपणा दिसून येतो. याशिवाय कोरड्या त्वचेच्या समस्येपासूनही मुक्तता मिळते.

– घरच्या घरी तयार केलेल्या पील ऑफ मास्कमध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच, त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Home Made Peel Off Mask For healthy and glowing skin)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.