Dental Problems | दातांच्या समस्यांनी हैराण? ‘हे’ घरगुती उपाय ठरतील गुणकारी!

बरेच लोक हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येला सामान्य समस्या मानतात. मात्र, असे दुर्लक्ष करणे अतिशय धोकादायक ठरू शकते.

Dental Problems | दातांच्या समस्यांनी हैराण? ‘हे’ घरगुती उपाय ठरतील गुणकारी!
दातांच्या समस्या
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 5:06 PM

मुंबई : चमकदार दात प्रत्येकालाच आवडतात. पांढरे चमकदार दात केवळ आपले आरोग्यच नाही तर, आपले सौंदर्यदेखील वाढवते. बरेच लोक हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येला सामान्य समस्या मानतात. मात्र, असे दुर्लक्ष करणे अतिशय धोकादायक ठरू शकते. यामागे काही गंभीर कारणे देखील असू शकतात. हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याचे कारण व्हिटामिन सीची कमतरता, यकृतासंबंधित समस्या, दातांची निगा न राखणे, हिरड्यांची इजा असू शकतात (Home remedies for bleeding gums and dental problems).

हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येमुळेही तुम्हीदेखील त्रस्त असाल, तर आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपचार सांगत आहोत, जे अवलंबुन तुम्हाला या समस्येतून आराम मिळू शकेल.

त्रिफळा

त्रिफळा हा घटक मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरला जातो. त्रिफळामधील औषधी घटक हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरतात. तुम्ही चहामध्ये त्रिफळा टाकून याचे सेवन करू शकता.

दररोज गुळण्या करा.

दररोज एक कप गरम पाण्यात एक चमचे मीठ मिसळून गुळण्या केल्याने हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर होते. मिठाच्या पाण्याने व्यवस्थित गुळण्या करा. मीठात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे हिरड्यांची सूज कमी करते. तसेच, इन्फेक्शन कमी करण्यास देखील मदत करते. दिवसातून 3 ते 4 वेळा मीठाच्या पाण्याने गुळण्या करा.

हळद आणि मोहरीच्या तेलाने मसाज करा.

दररोज थोड्या हळदीमध्ये एक चमचा मोहरीचे तेल आणि एक चिमूटभर मीठ घाला आणि आपल्या बोटाच्या सहय्याने हलका मसाज करा. हळदीमध्ये बरेच अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे हिरड्यांची सूज कमी करते. तसेच, इन्फेक्शन कमी करण्यास देखील मदत करते (Home remedies for bleeding gums and dental problems).

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. थोडासा संत्र्याचा रस, एक चमचा साखर आणि एक चिमूटभर जिरे मिसळून हिरड्यांवर चोळल्याने हिरड्यांचा त्रास दूर होतो.

लवंग तेल

लवंग तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे दात आणि हिरड्या यांच्या समस्या दूर करण्यात मदत करतात. लवंगमध्ये अँटी -इंफ्लेमेटरी आणि अँटी-प्लेक गुणधर्म आहेत.

आलं

आलं किसून घ्या आणि त्यात मीठ घालून पेस्ट करा. ही पेस्ट सूज आलेल्या हिरड्यांवर लावा आणि 10-12 मिनिटे तसंच ठेवा. मग चूळ भरा. हा उपाय तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा करता येईल. आल्यातील अँटी इंफ्लेमेट्री आणि अँटी ऑक्सीडंट्स गुणांमुळे हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा

हळद आणि बेकिंग सोडा मिक्स करून त्याने हिरड्यांना मालीश करा. मग चूळ भरा. बेकिंग सोड्याने ब्रश केल्यानेही हिरड्यांची सूज कमी होते. हा उपाय तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी एकदा असा करू शकता.

(Home remedies for bleeding gums and dental problems)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.