Health Tips | डोकेदुखीच्या समस्येने हैराण? मग, डाएटमध्ये सामील करा ‘ही’ पेय…

सतत कॉम्पुटर आणि मोबाईलचा अति वापर केल्याने डोकेदुखीची समस्या अधिक वाढते. या वेदनापासून मुक्त होण्यासाठी बरेच लोक वेगवेगळी औषधे देखील घेतात. डो

Health Tips | डोकेदुखीच्या समस्येने हैराण? मग, डाएटमध्ये सामील करा ‘ही’ पेय...
डोकेदुखीच्या समस्येने हैराण?
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 4:01 PM

मुंबई : धकाधकीचे जीवन आणि यामुळे बदललेली आपली जीवनशैली, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आरोग्यावरही मोठा परिणाम करतात. या सगळ्या कारणांबरोबरच ताणतणावामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होते. सतत कॉम्पुटर आणि मोबाईलचा अति वापर केल्याने डोकेदुखीची समस्या अधिक वाढते. या वेदनापासून मुक्त होण्यासाठी बरेच लोक वेगवेगळी औषधे देखील घेतात. डोकेदुखीमागे तणाव, थकवा इत्यादी करणे देखील असू शकतात (Home remedies for headache).

कदाचित आपणास हे माहित नसेल की, डोकेदुखी झाल्यास त्वरित औषध खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशावेळी डोकेदुखीवर उपाय म्हणून आपण काही घरगुती उपचार ट्राय शकता. या समस्येवर उपाय म्हणून आपण डाएट फॉलो करत असाल तर, आपल्या डाएटमध्ये ‘या’ पेयांचा समावेश नक्की करा.

पुदिनायुक्त चहा

या चहामध्ये औषधी गुणधर्म आहेत. पुदिनायुक्त चहा पिण्यामुळे आपल्या स्नायूंना आराम मिळतो. तसेच, आपली डोकेदुखीची समस्या दूर होते. पुदिना चहा पिण्यामुळे आपले शरीर देखील निरोगी राहते. चहाच्या सेवनाने स्नायू मोकळे होतात आणि डोकेदुखीची समस्या कमी होते.

आल्याचा चहा

आल्याचा चहा पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज आले घालून चहा घेतल्यास, शरीरात साखरेची पातळी नियंत्रण राहते. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मेंदूत ओपिएट्स सक्रिय करतात. यामुळे, डोकेदुखीची समस्या कमी होते.

लिंबू पाणी

डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लिंबू पाणी सर्वात फायदेशीर आहे. लिंबूमधील घटक आपल्या शरीरात एक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात. त्याच्या सुगंधाने शरीरातील थकवा नाहीसा होतो. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो (Home remedies for headache).

कॉफी

डोकेदुखी बरे करण्यासाठी आपण कॉफी पिऊ शकता. कॉफीमध्ये उच्च प्रमाणात कॅफिन असते. यामुळे डोकेदुखीची समस्या कमी होते. तसेच, दररोज ग्रीन टी आणि ब्लॅक टीचे सेवन करून आपण वजन देखील कमी करू शकता.

गरम पाणी

एका काचेच्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि लिंबाचा रस मिसळा. लिंबूयुक्त गरम पाणी प्यायल्याने डोकेदुखीपासून आराम मिळेल. तसेच, पोटात गॅस तयार झाल्यामुळे बर्‍याच वेळेस पोटदुखीची समस्या उद्भवते, यावरही उपाय म्हणून हे पाणी पिता येते.

तुळशीचा रस

अनेकदा डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं. अशावेळेस तुळशीच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पेलाभर पाण्यात तुळशीची 10-15 पानं घालून ते उकळून घ्या. जास्त उकळल्यानंतर उरलेलं निम्मं पाण्यात एक चमचा मध मिसळा आणि प्या. यामुळे डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळेल.

दालचिनी लेप

दालचिनी भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. डोकेदुखीची समस्या जाणवेल तेव्हा दालचिनीचे दोन-तीन तुकडे घेऊन त्यांचं चूर्ण करावं. त्यात थोडं पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करावी आणि ती कपाळाला लावावी. हा लेप साधारण अर्धा तास राहू द्यावा, त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावं.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

(Home remedies for headache)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.