Health | पोटदुखी, अपचनाकडे दुर्लक्ष करताय? उद्भवू शकते ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ची समस्या!

आपल्या आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम खराब जीवनशैली आणि तणावामुळे होतो. ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ याचेच एक उदाहरण आहे.

Health | पोटदुखी, अपचनाकडे दुर्लक्ष करताय? उद्भवू शकते ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ची समस्या!
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 10:44 AM

मुंबई : आपल्या आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम खराब जीवनशैली आणि तणावामुळे होतो. ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ याचेच एक उदाहरण आहे. या समस्येबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. हा रोग आपल्या पाचन तंत्राशी संबंधित आहे. याचा परिणाम आपल्या मोठ्या आतड्यावर होतो. ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ हा अतिशय कार्यशील रोग आहे. या आजारामध्ये पोटात दुखणे, पेटके येणे, बद्धकोष्ठता, पोट फुगी या समस्या उद्भवत आहेत (Home remedies for Irritable bowel syndrome).

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ही समस्या आहार आणि जीवनशैलीद्वारे बरी करता येते. पण, दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तब्येत अधिक गंभीर वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. मात्र, काही गोष्टींचे सेवन केल्याने या समस्येला टाळता येते. चला तर, जाणून घेऊया या पदार्थांबद्दल…

दही

पोटासंबंधित समस्या दूर करण्यासाठी दह्याचे सेवन करा. दहीमध्ये असणारे व्हिटामिन सी, ई, बी-12 सारखे अनेक पोषक पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने अपचन होते. काही खाल्ल्यानंतरच दह्याचे सेवन करा. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, जे पाचनशक्ती मजबूत करण्यासाठी कार्य करतात (Home remedies for Irritable bowel syndrome).

आल्याचे तेल

आल्यामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे बद्धकोष्ठता, गॅस आणि सूज कमी करण्यास मदत करतात. आल्याचे तेल या सर्व समस्यांतून मुक्त होण्यास मदत करते. आल्याच्या तेलामध्ये लिंबाचा रस टाकून वापरल्याने अनेक समस्या बऱ्या होतात.

हिंग

घराती अनेक वडीलधारी माणसे किंवा आपली आजी नेहमी पोटाच्या समस्येसाठी हिंगाच्या सेवनाचा सल्ला देते. हिंग भाजून, त्याची बारीक पूड करून घ्या. हिंग इरिटेबल बॉवेल सिंड्रोम बरे करण्यास मदत करते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा हिंग टाकून प्या. हिंग तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून देखील मुक्त करते.

(टीप : कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

(Home remedies for Irritable bowel syndrome)

हेही वाचा :

आता नाकातून कोरोनाची लस, इंजेक्शनची गरज नाही; नागपूरमध्ये होणार ट्रायल

Bird Flu Alert |  ‘बर्ड फ्लू’पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.