Stretch Marks : गर्भावस्थेदरम्यान का येतात ‘स्ट्रेच मार्क्स’? जाणून घ्या याचे कारण आणि उपाय…

गरोदरपणात स्त्रीयांच्या शरीरात बरेच बदल होतात. ‘स्ट्रेच मार्क्स’ देखील याच बदलांचा एक भाग आहेत. स्ट्रेच मार्क्स म्हणजे त्वचा ताणली जाण्याच्या खुणा. (Home remedies stretch marks)

Stretch Marks : गर्भावस्थेदरम्यान का येतात ‘स्ट्रेच मार्क्स’? जाणून घ्या याचे कारण आणि उपाय...
स्ट्रेच मार्क्स
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 10:06 AM

मुंबई : गरोदरपणात स्त्रीयांच्या शरीरात बरेच बदल होतात. ‘स्ट्रेच मार्क्स’ देखील याच बदलांचा एक भाग आहेत. स्ट्रेच मार्क्स म्हणजे त्वचा ताणली जाण्याच्या खुणा. शरीराच्या कोणत्याही भागावर स्ट्रेच मार्क्स पडू शकतात. परंतु, बहुतेक वेळा ते ओटीपोटाच्या खालच्या भागात, पार्श्वभाग, मांडी आणि स्तनांवर दिसतात. गर्भावस्थेदरम्यान सहसा दुसऱ्या तिमाहीत स्ट्रेच मार्क्स येतात (Home remedies for reducing stretch marks on the body).

खरं तर, गर्भधारणेदरम्यान पोट वाढण्यामुळे, केवळ आपल्या त्वचेचा वरचा थरच वाढत नाही, तर खालच्या थर देखील ओढला जातो. यामुळे त्वचेतील कोलेजन थोडासा तुटतो आणि या स्ट्रेच मार्क्स म्हणून पाहिले जाते. स्ट्रेच मार्क्स एखाद्याला हलके असतात आणि कुणाला अगदी खोल असतात, कारण हे अनुवंशिक देखील असू शकतात. वेळेवर स्ट्रेच मार्क्सवर उपचार न घेतल्यास, यापासून सुटका मिळवणं कठीण आहे. तसं तर आता बरेच लेझर उपचारदेखील आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही स्ट्रेच मार्क्स घालवण्याचा प्रयत्न करू शकता. पण त्यापेक्षा नैसर्गिकरित्या हा उपाय करणं जास्त चांगलं आहे.

‘हे’ उपाय येतील कामी

– कोरफडचा तुकडा मध्यभागी कापून किमान 15 मिनिटांपर्यंत स्ट्रेच मार्क्सवर मसाज करावा आणि नंतर कोमट पाण्याने तो भाग स्वच्छ करा. दररोज असे केल्याने स्ट्रेच मार्क्स हळूहळू हलके होतील.

– एक चमचा साखरेमध्ये बदाम तेल आणि लिंबाचा रस घालून घरगुती बॉडी स्क्रब बनवा. हा स्क्रब हलक्या हातांनी स्ट्रेच मार्क असलेल्या ठिकाणी मसाज करून लावा. नियमित वापर केल्यास कालांतराने, थोडासा प्रभाव दिसू लागेल.

– वाढीव वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित व्यायाम करा.

– भरपूर पाणी प्या, यामुळे त्वचा लवचिक होते. यासाठी तुम्ही पाण्याचे अतिरीक्त प्रमाण असणारी फळं आणि भाज्या खाऊ शकता. जसे की, टरबूज, काकडी, दुधी इत्यादी (Home remedies for reducing stretch marks on the body).

– पोषक घटकांनी समृध्द एक आहार घ्या. विशेषतः व्हिटामिन सी आणि डी असलेल्या गोष्टी खा.

– नारळ तेलाने स्ट्रेच मार्क्सवर दररोज हलक्या हातांनी मालिश करा. यामुळे देखील ही समस्या कमी होऊ शकते.

– कोको बटर त्वचेसाठी खूपच हायड्रेटिंग आणि पोषक असतं. हे सुरकुत्यादेखील त्वचेपासून दूर ठेवतं. स्ट्रेच मार्क्सवाल्या भागावर रोज दिवसातून दोन वेळा कोको बटरने मसाज करा. 1-2 महिन्यात तुम्हाला फरक दिसून येईल.

– बटाट्याचा रस काढा. हा रस स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर लावा. तीन आठवडे हा उपाय नियमित करा. हळूहळू स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Home remedies for reducing stretch marks on the body)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.